सोशल मीडियावर सध्या जंगली प्राण्यांनी लोकांवर हल्ले केल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय जंगली प्राण्यांजवळ जाताना निष्काळजपणा केल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या अनेक बातम्याही आपण वाचल्या आहेत. तरीदेखील अनेक अतिउत्साही लोक दुसऱ्यांच्या अनुभवावरुन काही धडा घेत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- पाळीव असला तरीही तो सिंहच…! जंगलाच्या राजाशी मस्करी करणं अंगलट, साखळी घालायला गेला अन्…

प्राण्यांवर प्रेम करणे, त्यांची काळजी घेणे आणि संरक्षण करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, समोरचा प्राणी कोणता आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काही धोका होऊ शकतो हे जाणून घेणंही महत्वाचे आहे. सध्या अनेक जंगली प्राणी पाळण्याचा ट्रेंड सुरु आहे. हे प्राणी माणसांमध्ये राहिल्यामुळे त्यांना नियंत्रित करणंही सोप्प असतही. पण वन्य प्राण्यांना कितीही प्रशिक्षण दिले तरीही ते त्यांचा मूळ स्वभाव कधी विसरत नाहीत. त्यामुळे वाघ सिंह असे प्राणी आपण पाळले असले तरी त्याच्यापासून सावधानता बाळगायला हवी. अन्यथा आपल्यावर संकट ओढावू शकतं.

हेही पाहा- पठ्ठ्याने क्रिकेटच्या कॉमेंट्रीसाठी वापरली Ola स्कूटर; देशी जुगाड पाहून कंपनीचे CEO म्हणाले, ‘मी आतापर्यंत…’

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहांना कैद केलेल्या एका खोलीत तरुण अतिउत्साहाने जातो मात्र त्याच्यावर अशी वेळ येते ते पाहून अनेकजण हिंस्र प्राण्यांजवळ जाताना दहावेळा विचार करतील यात शंका नाही. इंस्टाग्रामवर sumit_vishkarma2 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिंहाजवळ एक व्यक्ती गेला असता. अचानक सिंहांचा मूड बदलल्याचं दिसतं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही लोक सिंहाच्या पिंजऱ्यात घुसतात, ते पाहताच सिंह रागवतात आणि त्या लोकांवर हल्ला करतात. यातील काहीजण पळून जातात मात्र, सिंह एका तरुणाला पकडतात आणि त्याच्यावर हल्ला करतात.

व्हिडिओमध्ये, एक माणूस पिंजऱ्यातील सिंहांमध्ये अडकलेला दिसत आहे. तो या सिंहाना किती घाबरला आहे हे त्याचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. खरंतर सिंहाच्या पिंजऱ्यात अनेक लोक दिसत आहेत. त्यामुळे हे सिंह पाळीव आणि प्रशिक्षित असल्याचं दिसतं आहे. तरीही ते एखाद्या शिकारीवर हल्ला करावा त्याच पद्धतीने सिंह तरुणावर झेप घेताना दिसत आहेत. शिवाय हे सिंह त्या तरुणाचा चावा घेण्याचा प्रयत्नही करत आहेत. सिंहाच्या तावडीत सापडलेला हा तरुण त्यांच्या तावडीतून सुटण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतं आहे.

व्हिडीओ बनवणाऱ्यांवर नेटकरी भडकले –

हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा असून सिंहांमध्ये अडकलेल्या तरुणाला किती भिती वाटत असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. शिवाय तो घाबरला असताना त्याला वाचवण्याच सोडून काही लोक त्याला या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे माणसाच्या जीवापेक्षा व्हिडीओ महत्वाचा आहे का असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even after the lion attacked the young man people continued to shoot the video see viral video jap
Show comments