फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही प्रेमाची भाषा कळते असं म्हणतात. अनेकदा प्राण्यांशी संबंधित असे व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात, ज्यामध्ये माणसे आणि प्राणी एकमेकांवर मनापासून प्रेम करताना दिसतात. हे व्हिडिओ कधी आपले मन जिंकतात तर कधी आपल्याला भावूक करतात. नुकताच असाच एक लोकांच्या हृदयाला भिडणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान बाळ हरणाच्या पाडसासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओमध्‍ये दिसत आहे की, लहान पाडस बाळासह जिवलग मित्राप्रमाणे प्रेम करताना दिसत आहे. दोंघाच्या गोंडस व्हिडीओने लोकांना भुरळ घातली आहे. यामुळेच लोकांना हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरणाच्या पाडसाबरोबर खेळताना दिसले लहान बाळ

प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ दररोज इंटरनेटवर दिसत असतात, परंतु काही व्हिडिओ असे आहेत जे लोकांना वेड लावतात. असाच एक गोंडस व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे जो पुन्हा पुन्हा पाहिला जात आणि खूप पसंत केला जात आहे. एका लहान बाळाचा आणि हरणाच्या पाडसाचा हा मनमोहक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “अशी विचित्र फॅशन कधीही पाहिली नसेल!” बाजारात आता आले मगरीच्या आकाराचे शूज, पाहा Viral Video

हेही वाचा – नोकरी सोडताच तरुणीने घेतला बॉसचा बदला; सहकाऱ्यांच्या इमेलचे पासर्वड….

लोकांना प्रचंड आवडला व्हिडिओ

X (ट्विटर) वर व्हिडिओ शेअर करताना ‘दोन बाळ’ (Two Babay) असे कॅप्शन लिहिले आहे. अवघ्या १४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका घरात एक लहान बाळ पेटीजवळ उभे आहे. या पेटीत एक एक लहान पाडसे उभे आहे जे बाळाला जीभेने चाटत आहे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. आतापर्यंत १.७ दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर ६० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊन व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एकाने लिहिले की, ‘मला पाळीव प्राणी म्हणून हरणाचे पाडसे कसे मिळेल?’ आणखी एका युजरने लिहिले, ‘दोन आनंदाचे बंडल, अत्यंत मौल्यवान आहे.’