‘द ग्रेट खली’ या नावाने संपूर्ण जगात आपला ठसा उमटवणाऱ्या दलीप सिंह राणाबद्दल तुम्हाला माहीतच असेल. खलीने WWE मधील सर्वांत बलाढ्य खेळाडूंचा पराभव केला आहे. खली सध्या WWE मध्ये खेळत नाही. कारण- त्याने त्यातून निवृत्ती स्वीकारलीय. पण तो अजूनही सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ अपलोड करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. अनेकदा त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; ज्यावर त्याचे चाहते खूप मजेदार कमेंट्स करतात. आताही त्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये तो एक टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा या टास्कचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यात एक बाटली हवेत काही अंतरावर फेकून पुन्हा ती उभी करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी बाटलीत थोडे पाणीही ठेवले जाते. हा एक टाइमपास गेम आहे; जो खेळण्याचा लोक आनंद घेतात. खलीनेही हा गेम खेळतानाचा व्हिडीओही बनवत होता. बाटली हवेत फेकून, ती पुन्हा उभी करण्यासाठी त्याने अनेक वेळा प्रयत्न केला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खलीचा व्हिडीओ व्हायरल
लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स
हा व्हिडीओ खली पाजीने त्याच्या thegreatkhali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले- सर, ‘बुर्ज खलिफा’सोबत खेळत आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले- सर, सिलिंडर वापरून पाहा. तिसऱ्या युजरने लिहिले – सर, तुमच्या एका पाण्याच्या बाटलीने माझ्या गावाची तहान भागवा.