प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी मंगळसूत्रावर केलेली त्यांची वादग्रस्त जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाचीला इशारा दिला होता की, येत्या २४ तासात ही जाहिरात हटवली नाही तर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला जाईल. मिश्रा यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनीही यावर कठोर भूमिका घेतली. आता आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती देताना सब्यसाचीने सांगितले की ती जाहिरात काढून टाकली जात आहे.

गृहमंत्री काय म्हणाले?

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, डिझायनर मुखर्जी यांच्या मंगळसूत्राची जाहिरात अत्यंत आक्षेपार्ह आहे. दागिन्यांबाबत बोलायचे झाले तर धार्मिक दृष्टिकोनातून मंगळसूत्राला सर्वाधिक महत्त्व आहे. मंगळसूत्राचा पिवळा भाग माता पार्वती आणि काळा भाग भगवान शिव आहे असे आपण मानतो. शिवाच्या कृपेने स्त्री आणि तिचा पती यांचे रक्षण होते. शिवाच्या कृपेने स्त्री आणि तिचा पती यांचे रक्षण होते. माँ पार्वतीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी राहते. अशा परिस्थितीत अशा जाहिराती धार्मिक भावना दुखावणाऱ्या आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर इतर धर्मीयांवर अशा जाहिराती दाखवा, असे ते म्हणाले.

(हे ही वाचा: जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क )

काय म्हणाले सब्यसाची?

नरोत्तम मिश्रा आणि हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर सब्यसाचीने जाहिरात मागे घेतली. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याचे आम्हाला दुःख आहे, म्हणून आम्ही ही जाहिरात मागे घेत आहोत.

कुठून सुरु झाला वाद?

चार दिवसांपूर्वी सब्यसाचीने ज्वेलरी कलेक्शन लाँच केले. ‘द रॉयल बंगाल टायगर आयकॉन’ असे या कलेक्शन नाव आहे. यावरून मंगळसूत्राच्या जाहिरातीवरून गोंधळ सुरू झाला. कंपनीने या मंगळसूत्राला ‘द रॉयल बंगाल मंगळसूत्र १.२’ असे नाव दिले आहे. जाहिरातीत एक महिला आणि एक पुरुष असभ्य कपड्यांमध्ये एकत्र मंगळसूत्र घातलेले दाखवले आहे. सुरुवातीला सोशल मीडियावर याला खूप विरोध झाला.

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

हिंदू प्रथांवर हल्ला

सोशल मीडियानंतर हिंदू संघटनांनीही या वादग्रस्त जाहिरातीचा निषेध करण्यास सुरुवात केली. हिंदू सण येताच सर्जनशीलता का दिसू लागते, असे ते म्हणतात. ही जाहिरात हिंदू प्रथा आणि भावनांवर आघात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. हिंदू विवाहासारख्या पवित्र नात्याला या कंपन्या बदनाम करत आहेत.