तुम्ही प्राणिसंग्रहालयाला कधी भेट दिली आहे का? हिरव्या गार झाडांच्या सावलीत आराम करणारे प्राणी दिसतात. जंगलातील हे नयनरम्य दृश्य टिपण्याचा प्रयत्न सर्व जण करत असतात. कधी झाडाखाली नाचणारा मोर दिसतो तर कधी आपल्या आईच्या कुशीत निजलेले कांगारू दिसते. कधी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारे माकड दिसतात तर कधी इकडे तिकडे उड्या मारणारे हरिण दिसते. अनेकदा लोक असे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. असाच एखादा क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती चक्क नाचताना दिसत आहे. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. व्हिडीओ पाहून तुम्हाला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हत्तीचा डान्स पाहिला आहे का?

व्हायरल व्हिडीओमध्ये २ तरुणी भरतनाट्यम नृत्य करत आहे आणि त्यांच्याबरोबर मागे उभा असलेला हत्ती देखील त्यांच्यासह नाचत आहे. हत्ती आपली सोंड आणि कान हलवत आहे. जसे जसे त्या तरुणी डान्स करत होत्या त्याचप्रमाणे हत्ती देखील त्यांच्याप्रमाणे डुलत आहे.

व्हायरल व्हिडिओचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दोन मुली भरतनाट्यम करत आहेत जेव्हा अचानक एक हत्ती त्याच्यांबरोबर डान्स करू लागतो.त्यांच्याबरोबर नाचू लागत आणि सुंदरपणे डुलतो.”

हेही वाचा – हे चीनी लोक काहीही खातात”; चीनच्या पिझ्झा हटमध्ये विकला जातो तळलेल्या बेडकाचा पिझ्झा, फोटो होतोय तुफान Viral

पण व्हायरल व्हिडीओबाबत IFS अधिकारी परवीन कासवान यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या मते “हा हत्ती तणावग्रस्त आहे. हे नृत्याचे लक्षण नसून तणावाचे लक्षण आहे कृपया याचा गौरव करू नका.

IFS अधिकारी कासवा यांच्या मतावर सहमती दर्शवताना IASसुप्रिया साहू यांनी सांगितले की, हत्ती जेव्हा ते दबावखाली किंवा तणावाखाली असतात तेव्हा ते असे करतात.हे भरतनाट्यम नाही”. सुप्रिया साहू IAS यांनी यापूर्वी पर्यावरण हवामान बदल आणि वन विभागासाठी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.

हेही वाचा – Viral Video: लॉलीपॉप, कबाबवर तुटून पडले लोक! नॉनव्हेजसाठी लग्नात पाहुण्यांची धक्काबुक्की! व्हेज जेवणाकडे कोणी फिरकले सुद्धा नाही

अभ्यासानुसार,हत्तींमध्ये त्यांच्या मालकांनी केलेल्या नृत्यासारख्या हालचाली किंवा मानवी हातवारे सारख्या वर्तनांची नक्कल करण्याची क्षमता असते असे म्हटले जाते. त्यामुळे अनेकांना हत्ती डान्स करत आहे असे वाटले पण अधिकाऱ्यांनी व्हिडीओची सत्य उघड केले आहे.