पिझ्झा खायला कोणाला आवडत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पिझ्झा आवडीने खातात. पिझ्झा हा जरी पाश्चात्य खाद्यसंस्कृतीमुळे भारतात आलेला खाद्यपदार्थ असला तरी खवय्यांना तो प्रचंड आवडतो. विविध भाज्यांसह चिजचे टॉपिंग असलेला गरमा गरम पिझ्झा खाण्याची मज्जा काही वेगळी आहे. पण तुम्हाला पिझ्झाला संस्कृतमध्ये काय म्हणतात माहिती आहे का?

“पिझ्झा” या संस्कृत शब्दावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी उत्सुक झाल आहेत
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने पिझ्झाचे वर्णन संस्कृतमध्ये “पिष्टजम्” असे केले आहे. या व्हिडिओने लोकांमध्ये हशा पिकला आहे. यश साळुंके (yasalunke_) नावाच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये घरी पिझ्झा खात असताना त्याला कोणीतरी त्याला विचारले की,”संस्कृतमध्ये पिझ्झाला काय म्हणतात? कोणताही विचार न करता यशने उत्तर दिले, “पिष्टजम्”.

व्हिडिओची सुरुवातीला यश त्याच्या बेडवर पिझ्झाचा बॉक्स घेऊन बसलेला दिसतो. तो पिझ्झाचा खाताना दिसला तेव्हा एका महिलेने त्याला उत्सुकतेने विचारले, “अहो, यश, किम खदासी? (वाह, यश, तू काय खात आहेस?)”. “पिस्ताजम”, त्याने सौम्य हास्यासह उत्तर दिले.

या व्हिडिओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले असले तरी, “पिस्ताजम” हा शब्द प्राचीन भाषेतील खरा शब्द आहे की व्हिडिओसाठी फक्त एक मजेशीर विनोद आहे हे स्पष्ट केलेले नाही. तरीही, ही क्लिप खाद्यप्रेमी, भाषाप्रेमी आणि आधुनिक संस्कृती आणि प्राचीन भाषांचा संगम मनोरंजक वाटणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर प्रतिक्रिया

इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर काही मिनिटांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी ‘हशा’ आणि ‘स्वादिष्ट’ इमोजीसह रीलवर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर ही प्रभावी आणि खाद्यपदार्थांची आवड निर्माण केल्याबद्दल साळुंके यांचे आभार मानले.

यशने शुक्रवारी व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, “संस्कृतममध्ये पिझ्झाला काय म्हणतात?”. ऑनलाइन पोस्ट झाल्यानंतर ३० मिनिटांतच, या क्लिपला १८,००० व्ह्यूज आणि ५००+ लाईक्स मिळाले. माहितीपूर्ण आणि मजेदार, ही क्लिप व्हायरल झाली आहे. आता लोक चर्चा करत आहेत की पिझ्झाला खरोखर संस्कृतमध्ये पिष्टजम म्हणतात का, ती फक्त एक विनोद होती.

Story img Loader