छोट्याशा गावातून आलेला रिल्स्टार सुरज चव्हाण हा बिगबॉस सिझन पाचचा विजेता ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनाचा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. सामन्य कुटुंबातून आलेल्या सुरज चव्हाणला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम दिले. सुरजचे व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणा आणि त्याचा खेळ यामुळे त्याला चाहत्यांचा पाठिंबा मिळाला. सुरजच्या विजयाचा आनंद फक्त त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नाही संपूर्ण महाराष्ट्राला झाला आहे.सुरजचा विजयी होतानाचा तो क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदोत्सव होता. सुरजच्या हातात बिगबॉस मराठीची ट्रॉफी पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातील त्याचे चाहते आतुर झाले होते. सध्या जर्मनीमध्ये सुरजच्या विजय पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडिओ सुरजच्या जर्मनीत असलेल्या एका चाहत्याने पोस्ट केला आहे. सर्वजण जर्मनीतील एका हॉटेलमध्ये आहेत आणि आपल्या मोबाईलवर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनाचा ग्रँड फिनाले सोहळा पाहात आहे. जेव्हा रितेश देशमुख सुरजाचा हात पकडून त्याला विजयी घोषित करतात आणि त्याच्या हातात गबॉस मराठीची ट्रॉफी देतात तेव्हा त्याचे चाहत्यांना आनंद होतो. ते आनंदाने टाळ्या वाजवतात. त्यानंतर व्हिडीओमध्ये एक तरुण सांगतो की, आज फक्त सुरज जिंकला नाही तर सुरजबरोबर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती आणि त्याला साथ देणारे सर्व लोक जिंकले आहेत. जय महाराष्ट्र”
व्हिडिओ इंस्टाग्रामवर jhingat_sunnya’s नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये,”जर्मनीमध्ये सूरजच्या विजयाचा क्षण” हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – “मी पुण्यात आहे की परदेशात?”, पुणेरी आजींचा पहिला मेट्रो प्रवास, Video होतोय Viral
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “झापूक झुपुक विजेता सुरज चव्हाण”
दुसऱ्याने कमेंट केली. “होय भाऊ आज संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्र सुरजा विजय पाहत आहे
तिसऱ्याने लिहिले की, “होहो दादा मी पण UAEमध्ये राहते. मी बारामतीची आहे. खूप अभिमान वाटतो सुरजला भेटली बिगबॉसची ट्रॉफी. मी खूप आनंदी आहे.”
हेही वाचा – cheers for Suraj Chavan’s victory in Germany
चौथ्याने लिहिले, “ज्यांनी सुरजला वोट केले ते सर्व जिंकले”
पाचवा लिहिले, “आख्खा महाराष्ट्र जिंकला आहे.'”
सहाव्याने लिहिले, “आपला भाऊ जिंकला”