लग्न म्हणजे फक्त नवरा-बायकोचा संसार नसतो. लग्न हा दोन कुटुंबाना जोडणारी गोष्ट आहे. सासू-सासरे, नणंद, दीर, मेव्हणा-मेव्हणी, भावजय, साडू अशी कित्येक नाती नवरा-नवरी दोघांबरोबर जोडली जाता लग्नानंतर पती-पत्नी दोघांना एकमेकांच्या घरच्यांना सांभाळून घ्यावे लागते. एकमेकांच्या आणि कुटुंबाच्या गरजा समजून घेऊन निर्णय घ्यावे लागतात. गरज पडली तर आपल्या गरजा बाजूला सारव्या लागतात. कुटुंबाच्या आनंदासाठी अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते. मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा तिला खूप नव्या बदलांचा सामना करावा लागतो. नव्या घरात, नव्या लोकांमध्ये मिसळून राहण्यासाठी अनेकदा तडजोडदेखील करावी लागते. तेव्हाच कुठे संसार सुखाचा होतो पण प्रत्यक्षात घडतं मात्र वेगळंच. लग्नानंतर अनेक कुटुंबामध्ये सासू-सुना यांच्यामध्ये वाद होताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजकालच्या सुनाना लग्नानंतर नोकरी करून घर सांभाळायचे असते त्यामुळे तिच्या सासूकडून वेगळ्या अपेक्षा असतात तर वर्षानुवर्ष सर्वांसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या सासूच्या सुनेकडून वेगळ्या अपेक्षा असतात. अशा स्थितीमध्ये जर सासू-सुनांमध्ये जर संवाद नसेल, एकमेंकाना समजून घेण्याची इच्छा नसेल तर वाद होणारच. सासूला नक्की आपल्याकडे काय अपेक्षित आहे हे समजून घेणे नवविवाहित वधूला समजून घेणे जरा अवघड जाऊ शकते. अशाच गोंधळात असलेल्या सुनांना आपल्या अपेक्षा सांगणाऱ्या सासूबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.

हेही वाचा – जगातल्या टॉपच्या १० स्मार्ट शहरांमध्ये भारताचं एकतरी शहर आहे का? येथे पाहा यादी

व्हायरल व्हिडीओमध्ये ek.tee नावाच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये एक महिला आजकालच्या सुनांकडून काय अपेक्षा आहेत याबाबत सांगत आहे. “आजकालच्या सासू खूप वेगळ्या आहेत. पुर्वी सुन म्हणून आम्ही सासूचं ऐकलं, सासूच्या पुढे पुढे केलं. आम्ही तेव्हा गृहिणी होतो. पण आजकालच्या मुली फक्त गृहिणी नाही, त्यांना घर सांभाळून, संसार सांभाळावा लागतो. त्यामुळे त्यांची तडजोड लक्षात येते. तुम्ही थोडी तडजोड करा आम्ही तोडी तडजोड करतो. आम्ही दोन पावले पुढे येऊन घरातील सगळं काम करतो. तुम्ही पण दोन पावले पुढे या. तुम्ही प्रेमाने राहा, थोड आदर म्हणून पाणी द्या. आम्ही काय फक्त कामचं करायचं का? पण तुम्ही पैसे कमावता, तर तुम्ही बाई ठेवा, आमची काही हरकत नाही. आम्ही पण आनंदात राहू. मुलांना सांभाळायला बाई ठेवा आम्ही त्यांच्या मागे फिरू, आमची हरकत नाही. कारण आमच्या वयात आम्हाला सर्व करता येणार नाही.आम्हीपण थकलो आहोत, आमचे गुडघे दुघतात. तुम्हाला पण समजून घेऊ. आम्ही त्रास द्यायचा प्रश्नच नाही ना. एकुलती एक मुलं…तर आम्ही त्रास कशाला देऊ. आम्हाला घरं टिकवायाचं आहे ना. आम्हाला सुना पाहिजे, पण सुनांना आम्ही नको आहे. कधी कधी मुलांनी वाटतं की आपण आपला वेगळा संसार थाटू या. आम्हाला काय वाटतं की, आपण सोबत राहू, आम्ही एकटं राहू नाही शकत ना. तुम्ही काम करू नका. आम्ही तुम्हाला ताटपण हातात देऊ पण प्रेमाने वागा. जसे तुम्ही आईला मानता तसे आम्हाला माना. बास एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू. माहेरी जेवढे लाड केले जातात तेवढेच लाड आम्ही देखील करू. तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन देऊ. अशा पण आम्ही सुनांना जास्त जीव लावणाऱ्या आहोत आणि आम्ही लावतो.”

हेही वाचा – ९ वर्षांच्या चिमुकलीचे गाणे ऐकून आनंद महिंद्राचे डोळे आले भरून, केले तोंडभरून कौतूक; पाहा Viral Video

व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण या सासूबाईंचे विचार ऐकून कोणतीही मुलगी म्हणेल, “सासू असावी तर अशी” व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की,”सासू आई होऊ शकते पण सून मुलगी झालेली सासूला नाही झेपणार. कारण जसं मुलगी आईबरोबर वागते तस जर हक्काने सासूबरोबर वागली तर ते सासू खपवून नाही घेऊ शकणार. त्यामुळे बोलणं सोपं असतं प्रत्यक्षात उतरवणं सासूला अवघड जात.” दुसरा म्हणाला, “कॅमेऱ्यासमोर सगळे छान वागतात. घरी मात्र सगळं तेच.”तिसरा म्हणाला, “आत्ताच्यापण सासू पूर्वीच्या सासू सारख्याच आहेत.” चौथा म्हणाला, अशी सासू हवी. अशी सासू मिळणे शक्य आहे का?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every daughter in law should get such a mother in law have you heard the expectations of the mother in law every daughter should watch this viral video snk
Show comments