Viral Video : आई ही आई असते. ती आपल्या बाळासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्यास तयार असते. कितीही वाईट प्रसंग आला तरी आई आपल्या मुलांना फुलाप्रमाणे जपते.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चिमुकल्या बाळाला कुशीत घेऊन कानातले विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही भावूक व्हाल.
असं म्हणतात की प्रत्येक आई एक हिरकणी असते . हो, हे खरंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या आईमध्ये हिरकणी दिसेल.बाळाला कुशीत घेऊन कानातले विकणारी ही आई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ लोकल ट्रेनमधील आहे. लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच हा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आई लोकल ट्रेनमध्ये बाळाला कुशीत घेऊन दिसतेय. ती कानातल्याचा स्टॉल बांधून बॅगमध्ये ठेवताना दिसत आहे. बाळ शांत झोपलेले दिसत आहे. त्यानंतर बाळाची झोपमोड होऊ नये म्हणून ती लोकल ट्रेनमध्ये खाली सुद्धा बसताना दिसतेय. या आईची बाळावरील माया आणि संघर्ष पाहून कोणीही थक्क होईल. हिरकणी आईला पाहून काही जण भावूक सुद्धा होऊ शकतात.
sonal_dhananjay या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक आई असतेच हिरकणी !हो ना ? कंमेंट्स मध्ये सांगा” या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडे शब्द नाही… हा व्हिडीओ खरंच खूप भावनिक आहे. भारतात लोकांना वाटते री मुलांना सांभाळणे, ही आईची जबाबदारी असते.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप जास्त आदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईला कोणाचीच तोड नाही. प्रत्येक आईमध्ये हिरकणी आहेच.”