सध्याच्या काळातील वाढती महागाई सर्वांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. शिवाय अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांसाठी काही गोष्टी विकत घेणं अशक्य झाले आहे. आताचा काळ महागाईचा असून आधीच्या काळात एवढी महागाई नव्हती, असं अनेकदा आपणाला सांगितलं जातं. शिवाय सध्या सोशल मीडियावर काही वस्तूंची जुनी बिले व्हायरल होत आहेत. ज्यातील वस्तूंच्या किमती पाहून अनेकजण थक्क होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच आता आणखी एका बिलामुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण सध्या अशा एका बिलाचा फोटो व्हायरल होत आहे ज्यातील सोन्याचा दर पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल यात शंका नाही. कारण व्हायरल होत असलेले बिल हे ६४ वर्षांपुर्वीचे आहे. ज्यात १० ग्रॅम म्हणजे एक ताळे सोन्याची किंमत ही सध्याच्या एक लिटर पेट्रोलच्या किमतीपेक्षाही कमी असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- ऐकावं ते नवलच! ‘या’ कंपनीत गांजा पिणाऱ्याला मिळणार महिना ७ लाखांचा पगार; कसा ते जाणून घ्या

११३ रुपयांना एक तोळे सोने –

व्हायरल होत असलेल्या या फोटोमधील सोन्याचे बिल हे वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचे आहे. हे बिल मराठीत असल्यामुळे ते महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट होत आहे. या बिलामध्ये शिवलिंग आत्माराम नावाच्या व्यक्तीने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले आहेत. ज्याची एकूण किंमत ९०९ रुपये दिसत आहे. या बिलानुसार १० ग्रॅम सोन्याची किंमत त्यावेळी केवळ ११३ रुपये आहे. तेवढेच सोने घेण्यासाठी सध्या ५२ ते ५५ हजार रुपये लागतात. त्याचवेळी १९५९ मध्ये म्हणजे ६४ वर्षांपूर्वी एक किलो सोने केवळ ११,३०० रुपयांना मिळायचे. त्यामुळे सध्या महागाई किती प्रमाणात वाढली आहे याचा अंदाज आपणाला लावता येऊ शकतो.

हेही वाचा- टायटॅनिकचे आतापर्यंत कोणीही न पाहिलेले दुर्मिळ फुटेज आले समोर; Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

काही दिवसांपुर्वी बुलेटच्या जुन्या बिलासोबतच गव्हाच्या किमतीचीही जुनी बिले सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अशातच आचा ६४ वर्षापुर्वीचे सोन्याचे दर पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने, जुने दिवस म्हणजे सर्वात सुखाच्या दिवसांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने ६४ वर्षांपूर्वीच्या १०० रुपयांची किंमत आजच्या काळातील ५० हजार रुपयां इतकी असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everyone is shocked to see the price of 10 grams of gold in the bill found 64 years ago jap
Show comments