टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ट्विटरचे भावी मालक इलॉन मस्क यांनी एकदा म्हटले होते की जर लोकांनी अधिक मुले जन्माला घालणे बंद केले तर मानवी सभ्यता नष्ट होईल. २०२२ मध्ये, इलॉन मस्क यांच्या जुळ्या मुलांबाबत खुलासा झाला आहे. यानंतर इलॉन मस्क यांना वेगवगेळ्या तीन जोडीदारांपासून ९ मुलं असल्याचं समजतंय. या जुळ्या मुलांना टेस्ला कर्मचारी सिव्हॉन जिलिस यांनी जन्म दिल्याचे सांगण्यात येत आहे. सिव्हॉन जिलिस मस्कच्या ब्रेन चिप बनवणाऱ्या स्टार्टअप न्यूरालिंकशी संबंधित आहे. या मुलांचा जन्म नोव्हेंबर २०२१ मध्ये झाला होता.
मस्क आणि सिव्हॉन यांनी जुळ्या मुलांची नावे बदलण्यासाठी याचिका दाखल केली होती. यानंतर टेक्सासच्या न्यायाधीशांनी नाव बदलण्यास मान्यता दिली. बिझनेस इनसाइडरने बुधवारी उघड केले की या बाळांच्या नावाच्या शेवटी मस्क आणि मध्यभागी सिव्हॉन असेल.
अबब! या माणसाने फक्त दातांच्या मदतीने खेचल्या तब्बल पाच गाड्या; पाहा Viral Video
मस्कला कॅनेडियन गायक ग्रिम्सपासून दोन मुले आहेत. त्याला त्याची माजी पत्नी आणि कॅनेडियन लेखक जस्टिन विल्सनपासून ५ मुले आहेत. मस्क आणि ग्रिम्स यांनी सरोगेट महिलेच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, मस्कने सरोगसीद्वारे आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही जुळी मुले जन्माला आली होती.
इलॉन मस्क जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याचे समर्थक आहेत. त्यांना लहान मुले खूप आवडतात आणि ते असे मानतात की जर कमी माणसे असतील तर मानवी सभ्यता संपुष्टात येईल. पृथ्वीवर पुरेशी माणसे नाहीत, असे त्यांनी पूर्वी सांगितले होते. मस्क जे म्हणतात, ते आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही लागू करत आहेत.
कमी लोकसंख्येच्या संकटाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी एक खास ट्वीट केले आहे. “कमी लोकसंख्येच्या संकटाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ढासळणारा जन्मदर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका आहे. माझे शब्द लक्षात ठेवा. हे दुःखद आहे पण खरे आहे.” असे ट्वीट त्यांनी केले.
मस्क पुढे म्हणाले की लोकसंख्या कमी होण्याच्या दिशेने जन्मदराचा ट्रेंड स्पष्टपणे दिसत असला तरीही पृथ्वीची लोकसंख्या जास्त आहे या भ्रमात लोक आहेत. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांना इतकी मुले का आहेत, तेव्हा मस्क यांनी सांगितले होते की ते लोकांसमोर एक उदाहरण मांडत आहे आणि ते जो उपदेश करतो त्याचे पालन ते स्वतःही करतात.