वडील आणि लेकीचं नातं एक वेगळंच असतं. वडीलांचा लेकीवर जीवापाड प्रेम असतं. लेकीचा प्रत्येक हट्ट पुरवण्यात वडीलांचा आनंद असतो तर आपल्या वडीलांची सेवा करण्यात लेकीचा आनंद असतो. लेक सासरी गेली तरी कधी आपल्य आई-वडीलांना विसरत नाही. लेकीला वडीलांची काळजी नेहमी वाटत असते म्हणून कितीही दूर असले तरी ती कधीही वडीलांची विचारपूस करायला विसरत नाही. लहान वयातच मुलींना वडीलांचे प्रेम जाणवते. लाडक्या बाबासाठी प्रत्येक गोष्ट करताना लेकीला आनंद होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली आपल्या लाडक्या बाबासाठी चपात्या लाटत आहे.

हेही वाचा –स्पीडब्रेकरला धडकून हवेत उडत आहेत गाड्या! वाहनचालकांचा जीव धोक्या, पाहा Viral Video

सोशल मीडियावर बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम दर्शवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओ नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली मुलगी आपल्या आईबरोबर चपात्या लाटताना दिसत आहे. छोटासा पोळपाट आणि छोटसं लाटणे घेऊन आपल्या इवल्या इवल्या हातांनी ही चिमुकली चपाती लाटत आहे. पाहणाऱ्यांना वाटेल की आपल्या आईला मदत करते आहे पण हा सर्व खटाटोप आईसाठी नव्हे तर बाबांसाठी सुरु आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवरdreamgirl_shraav नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “बाबासाठी स्पेशल चपाती, सगंळ काही बाबांसाठी”

हेही वाचा – “सेल्फीच्या नादात…” रेल्वे रुळावर मित्राबरोबर व्हिडिओ शुट करत होता, तेवढ्यात भरधाव वेगाने आली ट्रेन अन्…. थरारक घटनेचा Video Viral

व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडीओवर एकाने कमेंट करत सांगितले की,” लय भारी दिसते चपाती “
दुसऱ्याने म्हटले की, “पेढा बनवलाय बाबांसाठी”
तिसऱ्याने म्हटले,”किती गोड”
चौथ्याने म्हटले, “खूप छान केली चपाती”