Viral Video : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. लोक निसर्ग न्याहाळण्यासाठी घराबाहेर पडत आहे. डोंगर, नदी, झरे, धबधबे किल्ले इत्यादी ठिकाणी भेट देत आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक जण नदी नाल्यात वाहून जात असल्याचा बातम्या सुद्धा समोर येत आहे. त्यामुळे लोकांना पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे तरीसुद्धा अशा घटना कमी होताना दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका धबधब्याच्या ठिकाणी एक महिला अडकलेली दिसत आहे. या महिलेचे नशीब चांगले की तिला तेथील स्थानिक लोकांनी पाण्यातून बाहेर काढले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (everytime people cannot run to save you a woman was lucky was rescued by local people at waterfall shocking video goes viral)

नशीबवान होती महिला, मदतीला धावून आले लोक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला हातात चप्पल आणि खांद्यावर बॅग घेऊन धबधब्याच्या ठिकाणी ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात अडकलेली दिसत आहे. तेव्हा दोन स्थानिक लोक धावून येतात आणि त्या महिलेला पाण्यातून सुखरूप बाहेर काढतात. धबधब्यातून ओसंडून वाहणारे पाणी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं तोंडभरून कौतूक! विजयोत्सवानंतर अशी झाली होती मरिन ड्राईव्हची अवस्था, पाहा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C87F0a7vrz0/?igsh=bG9qNWFrb2RhbXBo

vashu.gupta.vlog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किती धोकादायक दृश्य आहे, पाहा कसे वाचविले महिलेला, तुम्ही स्वत: पाहा”

हेही वाचा : शेवटी भूक महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला बिबट्या अन् केला झेब्य्राच्या पिल्ल्यावर हल्ला; पुढच्या १० सेकंदांत जे काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दोन्ही भावाला खूप मोठा सलाम आणि त्यांचे मनापासून आभार” तर एका युजरने लिहिलेय, “इतक्या पावसात कोण जातात फिरायला. स्वत:चा जीव स्वत:च गमावतात. दरवर्षी अनेक घटना घडतात. सर्व काही बघतात तरीसुद्धा लोक आंधळे म्हणून वागतात.” महिलेच्या हातातील चप्पल पाहून एका युजरने खोचकपणे लिहिलेय, “जीव गेला तरी चालेल पण चप्पल जाऊ नये” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everytime people cannot run to save you a woman was lucky was rescued by local people at waterfall shocking video goes viral ndj
Show comments