जून महिन्यापासून सुरु झालेल्या राज्यातील सत्ताकारणाला शनिवारी रंजक वळण मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटांना ‘शिवसेना’ नाव तसेच ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही असं जाहीर केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केल्यानंतर दोनच दिवसांनंतर आयोगाने. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले आहे. तर शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून धगधगती मशाल देण्यात आली आहे. या निर्णयाचं ठाकरे गटाने स्वागत केलं असून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षात या मशाल चिन्हचा प्रचारही सुरु केला आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनीही आपला व्हॉट्सअप डीपीही बदलला आहे.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी मला फार दु:ख झालं”; उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘तो’ प्रसंग सांगत सुधीर मुनगंटीवार यांचं विधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर, शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला. ठाकरे गटाच्या वतीने पर्यायी पक्षनावे व चिन्हे रविवारी जाही करण्यात आली. ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय आयोगाला दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, ते खुले करण्यात आल्याचं आयोगाने जाहीर केलं. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते. मात्र या पक्षाची पात्रता रद्द झाल्याने हे चिन्ह खुल्या यादीत आणून ते ठाकरे गटाला देण्यात आलं. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल असं आयोगाने उद्धव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “…त्यामुळे निवडणूक आयोगाला धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल”; ठाकरेंना ‘मशाल’ मिळाल्यानंतर CM शिंदेंचं विधान

या निर्णयानंतर शिवसेनेच्या ट्वीटर अकाऊंटवरील डीपी बदलून मशालीचा डीपी ठेवण्यात आला आहे. त्याखाली ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं गटाचं नावही दिसत आहे. अनेक शिवसैनिकांनी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर हे मशाल चिन्ह असणारे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला.

नक्की वाचा >> शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यासंदर्भात विचारलं असता रितेश देशमुख म्हणाला, “येणाऱ्या काळात जे घडणार आहे त्यावरुन आपल्याला…”

माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही आपला व्हॉट्सअप डीपी या निर्णयानंतर बदलल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा डीपी म्हणून धगधगत्या मशालीचा फोटो ठेवला आहे. या फोटोमध्येही शिवसेना आणि त्या खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं दिसत आहे.

नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

दरम्यान काल ठाकरे गटाला मलाश हे चिन्ह जाहीर झाल्यानंतर मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ठाकरे समर्थकांनी जल्लोष केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex cm uddhav thackeray changed is whatsapp dp to mashal new election symbol in between tussle with eknath shinde group scsg
Show comments