फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना असं म्हणतात. २०२५ची सुरूवात झाली आणि ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली. या वीकदरम्यान प्रेमी युगुल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट्स, फुले आणि अनेक गिफ्ट्स देतात आणि हा आठवडा साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीक नुकताच पार पडला. व्हॅलेंटाईन वीकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. सध्या एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात व्हॅलेंटाईन डे दिवशी तरुणाच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासाठी चक्क १०० पिझ्झांची ऑर्डर दिली.

एक्स बॉयफ्रेंडवर काढला राग

एका डिलिव्हरी पार्टनरने एका माणसाच्या दारात १० नाही तर तब्बल १०० पिझ्झा बॉक्स आणून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच व्हॅलेंटाईन डे पार पडला. या दिवशी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना खास सरप्राईज देतात. पण हे सरप्राईज गर्लफ्रेंडने दिलं नसून एक्स गर्लफ्रेंडने दिल्याचं बोललं जातंय. एका २४ वर्षीय मुलीने ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर सूड उगवण्यासाठी त्याच्यासाठी चक्क १०० पिझ्झांची ऑर्डर दिली, अशा दाव्यासह हा व्हिडीओ व्हायरल होतोय. आता यात सूड काय आहे? तर या पिझ्झाची ऑर्डर तिने कॅश ऑन डिलीव्हरी हा ऑप्शन निवडून केली होती. म्हणजेच आता या १०० पिझ्झांचे पैसे त्याला देणं भाग होतं.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की मॅजिकपिन या फूड डिलिव्हरी अ‍ॅपचा एक डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या दरवाजात पिझ्झाचे अनेक बॉक्स ठेवताना दिसतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @TimesAlgebraIND या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला “गुरगांव येथील २४ वर्षीय तरुणीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या घरी १०० पिझ्झा कॅश-ऑन-डिलिव्हरीच्या ऑप्शनने पाठवले” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला तब्बल ९.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, हे अत्यंत अपमानास्पद आहे! यावरून व्यवसाय आणि डिलिव्हरी एजंट दोघांनाही त्रास देण्यात आला आहे. ऑर्डर त्याने दिली नसल्यामुळे, त्याला ती नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “या नादात तो पदार्थ वाया गेला त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही आहे” तर एकाने “अरे हिने कुठल्या जन्माचा बदला घेतला” अशी कमेंट केली.

Story img Loader