Viral Video : सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर शाळेच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या होतात. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. शाळेच्या आठवणी, शाळेचे मित्र, शिक्षक कायम मनाच्या कोपऱ्यात जीवंत असतात. शाळेच्या दिवसातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेने दिवसाची सुरुवात होत असे. संपूर्ण शाळेतील विद्यार्थी मैदानावर एकत्र येऊन प्रार्थना म्हणायचे आणि नंतर वर्गात जायचे.
तुम्हाला आजही शाळेतील प्रार्थनेची आठवण येते का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तब्बल २० वर्षानंतर माजी विद्यार्थी शाळेत एकत्र आले आहेत आणि प्रार्थना म्हणताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तब्बल २० वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी लावली शाळेतील प्रार्थनेला हजेरी

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

या व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शाळेत प्रार्थना सुरू आहे पण या प्रार्थनेला विद्यार्थी नाही तर चक्क माजी विद्यार्थी हजर आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २० वर्षानंतर शाळेतील प्रार्थनेला हजेरी लावली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांचे शाळेतील दिवस आठवतील तर काही लोक व्हिडीओ पाहून भावूक होतील. काही लोकांना त्यांच्या शाळेत पुन्हा भेट द्यावी, असे वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. माजी विद्यार्थी मेळाव्यातील हा व्हिडीओ आहे.

हेेही वाचा : “शेवटच्या श्वासापर्यंत गेला नाही कुस्तीचा नाद” हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजोबांचा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेेही वाचा : परदेशातील ‘ती’ इमारत पाहून ब्लॉगर झाला इम्प्रेस; VIDEO तील भारतीय खाद्यपदार्थांचे दुकान तुमचेही मन जिंकेल

neskmaajhiishaalaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”माजी विद्यार्थी मेळावा – शाळेतील प्रार्थना २० वर्षांनंतर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी” तर एका युजरने लिहिलेय, “ही प्रार्थना आमच्या शाळेमध्ये पण शुक्रवारला म्हणायचो आम्ही सरस्वती पुजनला” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा व्हायला पाहिजे. शाळेची खूप आठवण येते” अनेक लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader