Jugaad for Cheating in Exam: बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. जिद्द, मेहनत आणि अभ्यास करण्याची त्यांची तयारी नसते. मात्र, परीक्षेमध्ये त्यांना पास देखील व्हायचे असते. मग अशावेळी विद्यार्थी कॉपी करून पास होण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. शाळेत विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या असतील. सध्या कॉपीचा असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे
काही विद्यार्थांना तहान लागली की विहिर खणण्याची सवय असते. म्हणजेच परिक्षा डोक्यावर आली की अभ्यासाला सुरुवात करायची. परंतु अत्यंत कमी वेळात अभ्यास होत नाही व नापास होण्याची भीती वाटू लागते. अशा परिस्थितीत मग हे विद्यार्थी कॉपी करण्याचे विविध मार्ग शोधू लागतात. सध्या महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. १०वी आणि १२चे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. अशातच एका विद्यार्थ्याची कॉपी करण्याची पद्धत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, विद्यार्थ्यांने थेट २० रुपयांच्या नोटेवर उत्तरे लिहिलेली. या नोटेवर त्याने आणखी एक नोट चीतकवलिये आणि आपली उत्तरे या दोन नोटांमध्ये ठेवली आहेत. या तरुणाने केलेला जुगाड पाहून सारेच थक्क झालेत.
शिक्षक देखील आता बरेच स्मार्ट झाले आहेत. कोण कॉपी करेल आणि कोण प्रमाणिकपणे पेपर लिहेल हे त्यांना विद्यार्थांच्या हावभावावरुनच कळतं. त्यामुळे अनेक विद्यार्थी कॉपी करण्याआधीच पकडले जातात. पण एका विद्यार्थाने असा एक फंडा शोधून काढला जो सहजरीत्या कोणाच्याही लक्षात येणार नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट! बीडमध्ये परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी; VIDEO व्हायरल
हा जुगाड सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “कॉपी करण्यासाठी असेही घडू शकते याची कोणीही कल्पना करू शकत नाही.” हा व्हिडिओ सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.