सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे लोकांचं चांगलच मनोरंजन होत असते. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये अनेकदा डान्सच्या व्हिडीओचा समावेश असतो. सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहिला तर तुम्हाला हसू आवरणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक अतिउत्साही माणूस स्टेजवर नाचणाऱ्या मुलीसोबत डान्स करायला जातो आणि तो नाचताना असा काही प्रकार घडतो की, त्या स्टेजवर नाचणाऱ्या मुलीला देखील तिचं हसू कंट्रोल करता येत नाही आणि ती हसत हसत जोराने स्टेजवरुन खाली पळून जाताना दिसतं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ किती मनोरंजक असेल याचा तुम्हीच अंदाज लावा.
हेही वाचा- Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @NarendraNeer007 नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहलं आहे की, “असला ब्रेकिंग स्टेज डान्स कुठेच पाहिला नसाल” त्यामुळे हा व्हिडीओ भन्नाट असल्याचं तरी तुम्हाला समजलं असेलच.
व्हायरल व्हिडीओत एका उत्सवानिमित्त डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं दिसतं आहे. त्यावेळी एक मुलगी स्टेजवर डान्स करताना दिसतं आहे. त्याचवेळी एक अतिउत्साही माणूस प्रेक्षकांमधून उठतो आणि थेट स्टेजवर नाचत असलेल्या मुलीसोबत डान्स करायला सुरुवात करतो. तो नाचत असताना गाण्याच्या तालावर वर उडी मारतो पण त्याच्या वजनामुळे तो चक्क स्टेज तोडून खाली गेल्याचं दिसतं आहे.
हा माणूस स्टेजमध्ये घुसल्यामुळे नाचणारी मुलगी सुरुवातीला घाबरते आणि नंतर तोंडाला हात लावते आणि हसत स्टेजवरुन खाली धूम ठोकते. मुलगी निघून जाते पण हे महाशय मात्र तिथेच अडकून पडल्याचं दिसतं आहे. त्यामुळे या माणसाची भर स्टेजवर फजिती झाली आहे. त्याची फजिती झाली असली तरी हा व्हिडीओ बघणाऱ्यांचं मात्र, चांगलंच मनोरंजन होतं आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अतिउत्साह दाखवला तर आपली फजिती होऊ शकते याचं भान ठेवायला हवं. असं व्हिडीओ पाहणारे म्हणत आहेत. दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत काही माहिती मिळालेली नाही.