वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास सुकर होण्यासाठी अनेक जण हवाई मार्गास म्हणजेच विमानातून प्रवास करण्यास पसंती देतात. रेल्वे, बस यांसारख्या प्रवास माध्यमांपेक्षा विमान अतिशय आरामदायी अनुभव देत असतो. नोकरदार वर्गासाठी जरी याची तिकिटं खिशाला परवडणारी असली, तरीही विमानतळावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतींवर मात्र अनेक जण नाखूष आहेत, असे एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर शेअर झालेल्या आणि व्हायरल होणाऱ्या एका पोस्टवरून समजते.

डॉक्टर संजय अरोरा असे या एक्स वापरकर्त्याचे नाव असून, विमानतळावर राजमा चावल [भात] आणि पिण्यासाठी कोक घेतल्यानंतर त्याचे एकूण ५०० रुपये भरावे लागले असल्याने, विनाकारण लावल्या जाणाऱ्या महाग दरांवर त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. सोबतच यास दिवसाढवळ्या केली जाणारी चोरी असेदेखील म्हटले आहे.

Crime NEws
Crime News : घरात चिकन बनवण्याचा आग्रह, आई आणि भावांनी गळाच आवळला; पोलिसांना कसा लागला खुनाचा छडा?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

हेही वाचा : नवीन वर्षाची पार्टी म्हणून झोमॅटोवर एकाच वेळी १२५ ऑर्डर्स! पाहा काय म्हणाले अॅपचे सीईओ….

त्यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, “मला समजत नाही की, विमानतळावर पैश्यांची अशी लूटमार का केली जाते? मी जेवणासाठी अगदी आपला साधा राजमा चावल आणि पिण्यासाठी कोक घेतले; तरी त्याचे मला चक्क पाचशे रुपये भरावे लागले आहेत. हे म्हणजे दिवसाढवळ्या चोरी करण्यासारखे आहे, नाही का? एखादी व्यक्ती जर विमानाने प्रवास करत असेल तर तिला असे लुटणे गरजेचे नाही”, असे काहीसे लिहिले आहे आणि त्यासोबत जेवणाचा फोटोसुद्धा पोस्ट केल्याचे आपण पाहू शकतो.

ही पोस्ट शेअर होताच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी आपले अनुभव सांगितले. तर हे एवढे पैसे कसे भरावे लागतात, त्याचे काहींनी स्पष्टीकणार दिले आहे. पाहा.

“मी एका एअरपोर्ट रिटेलिंग कंपनीचा भाग होतो. डेव्हलपरला किमान गॅरंटी [हमी] किंवा महसुलाचे २६% हवे असतात. त्यामुळे तुम्ही विमानतळावर मार्जिन म्हणून, एमएनएफ [mnf] + किरकोळ विक्रेता + डीलर + वितरक + विमानतळ डेव्हलपर + कर असे सर्वांचे मिळून पैसे भरत असता”, अशी माहिती एका वापरकर्त्याने दिली आहे.

विनाकारण ठेवलेल्या किमतींवर, “हो अगदी बरोबर. मला कोलकाता विमानतळावर असताना एक कप चहासाठी चक्क ३०० रुपये भराव लागले”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. “मलासुद्धा भुवनेश्वर विमानतळावर असताना एक कप चहासाठी १८० रुपये, तर सामोश्यांसाठी १०० रुपये भरावे लागले आहेत”, असे सर्व प्रतिक्रियांना सहमती दर्शवत तिसऱ्या नेटकाऱ्याने म्हटले.

हेही वाचा : बापरे, कॉकटेलच्या ग्लासवर केली ‘काळ्या मुंग्यांची’ सजावट! व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा

चौथ्याने, “एक विमानतळ बांधण्यासाठी, तिथे दुकान उघडण्यासाठी, त्या दुकानात कर्मचारी ठेवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागत असतात, म्हणून तुमचे अन्नपदार्थसुद्धा महाग मिळतात” असे लिहिले आहे. “विमानतळाची आणि आपली सुरक्षा करण्यासाठी सीआयएसएफ [CISF] जवान तैनात असतात आणि त्यांच्या सेवेसाठी विमानतळांना त्या जवानांना पगार द्यावा लागतो. मात्र, इतकी कडक सुरक्षा आपल्या बस किंवा रेल्वेमध्ये नसते”, असा फरक पाचव्याने मांडला आहे.

@chiefsanjay या अकाउंटवरून शेअर झालेल्या या पोस्टला आतापर्यंत २०९K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.