सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरील फोटो, व्हिडिओ आणि कंटेट व्हायरल होत असतो. आजकाल सोशल मीडियावर अन्नपदार्थांशी निगडीत वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होण्याचं प्रमाण आधिक आहे. बरेच युजर्स एखाद्या खास रेस्टॉरंट, अन्नपदार्थ किंवा रेसिपीशी निगडीत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हे विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात. या विचित्र पदार्थांना लोक फ्यूजन फूड असेही म्हणतात. सध्या असाच एका डीशचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून मिसळ प्रेमी चांगलाच संताप व्यक्त करतील.

कोणी काय खावे आणि कसे खावे हे त्या प्रत्येकाचा वयक्तीक प्रश्न आहे. पण मिसळसोबत इडली खाल्ल्याने एका महिलेला ट्रोल करण्यात आले. आ पण मिसळ ही पावासोबत खातो, मात्र या ही महिला इडलीसोबत मिसळ खाताना दिसत आहे. अदिती नावाच्या महिलेने तिच्या ताटात इडलीचे दोन तुकडे, एक वाटी मिसळ आणि लिंबाचा एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर मिसळ प्रेमींनी मिसळची अशी वाटल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.

पाहा पोस्ट –

हेही वाचा – लज्जास्पद! ‘सेक्स वर्करसाठी येथे संपर्क करा’ भागलपूर रेल्वे स्थानकाबाहेरचा अश्लिल Video व्हायरल, नेमकं काय घडलं?

अदिती नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटिजन कमेंट करत आहेत काही जणांनी तर या नवीन फ्यूजन फूड डिशवर संताप देखील व्यक्त केला आहे. यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं अशा काही संतापजनक प्रतिक्रिया नेटीझन्सनी यावर व्यक्त केल्या आहेत. काहीही करता येतं म्हणून ते करायचं असं नाही असंही एकाने म्हटले आहे. तर एकाने आणखी काय काय पाहायला लावणार आहेत असं म्हणत अशाप्रकारच्या प्रयोगांबद्दल नाराजी दर्शवली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही दोन्ही पदार्थांची अशा पद्धतीने वाट लावल्यामुळे राग आल्याशिवाय राहणार नाही.  

Story img Loader