दक्षिण कोरियन सिरीज स्क्विड गेमने जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. ही सिरीज रिलीज झाल्याच्या काही दिवसातच,नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक बनली आहे. प्रीमियर झाल्यापासून सिरीज अनेक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे आणि शोवर आधारित मिम्सच्या सोशल मीडियावर पाऊस पडत आहे.

स्क्विड गेम ही एक काल्पनिक जगण्याची सिरीज आहे,ज्यात मुले खेळू शकतील अशा खेळांमध्ये लोकांना सहभागी होणे आवश्यक आहे. स्क्विड गेममध्ये जीवन जिंकतात, किंवा जिंकण्यासाठी प्रयत्न करता करता मरतात. दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक शोच्या अनपेक्षित यशामुळे आनंदी आहेत. व्हरायटीशी बोलताना ते म्हणाले, “मला आधुनिक भांडवलशाही समाजाबद्दल एक रूपक किंवा दंतकथा अशी कथा लिहायची होती, जी जीवनाच्या स्पर्धेसारखी एक मोठी स्पर्धा दर्शवते. पण वास्तविक जीवनात आपणा सर्वांना भेटलेल्या पात्रांचा वापर करावा अशी माझी इच्छा होती. ”

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…

(हे ही वाचा: Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना)

स्क्विड गेमची एवढी लोकप्रियता का?

हा शो सुरुवातीला एक चित्रपट म्हणून विकसित करण्यात आला होता, परंतु नंतर त्याचा हेतू अधिक चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी याला सिरीजमध्ये रुपांतरित करण्यात आले. लोकांना सिरीजचे व्यसन आहे आणि सिरीज वेगळ्या देशातील असूनही लोकांना सिरीज संबंधित वाटते. संगमयुंग विद्यापीठाचे ग्लोबल कलचर कॉटेंटचे प्राध्यापक किम प्योंग-गँग यांना वाटते की स्क्विड गेमप्रति दर्शकांना सापडलेल्या कनेक्शनमागे एक ठोस कारण आहे. बीबीसीशी बोलताना किम म्हणाले, “लोक, विशेषत: तरुण पिढी, जे नियमित जीवनात नियमितपणे परकेपणा आणि नाराजीने ग्रस्त असतात, त्यांना या पात्रांबद्दल सहानुभूती वाटते.” स्क्विड गेमने अनेक समस्या दर्शविल्या आहेत. लंडनस्थित लेखक टेलर-डायर रंबल म्हणतात, “यात अनेक समस्या दाखवल्या आहेत, जसे की कर्जामुळे निर्माण झालेल्या समस्या. त्यामुळे प्रेक्षक त्याच्याशी जोडलेले आहेत, विशेषत: साथीच्या काळ जो लोकांसाठी कठीण आहे.”

(हे ही वाचा: अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ)

उपशीर्षकांमध्ये समस्या

उपशीर्षकांचा एक मजबूत मुद्दा आहे. प्रेक्षक याबद्दल तक्रार करत आहेत. लोक विशेषतः इंग्रजी उपशीर्षकांबद्दल तक्रार करत आहेत, असे सांगत आहेत की वाक्य चुकीची आहेत आणि अनुवादातील फरकामुळे शोचा संपूर्ण अर्थ बदलतो. असे असले तरी, स्क्विड गेम अजूनही प्रेक्षकांवर राज्य करत आहे. तर त्याचे प्रचंड यश पाहता, लेखक-दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युक यांनी अजून सिक्वेल बनवण्याचा विचार केला आहे का? यावर चित्रपट निर्मात्याने व्हरायटीला सांगितले, “माझ्याकडे ‘स्क्विड गेम २’साठी चांगली योजना नाही.’

Story img Loader