देशभरामध्ये सुरु असणाऱ्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच राज्यातील आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यात अशाप्रकारचा कोणताही तुटवडा नसल्याचं भाष्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. मात्र आता त्यांनीच आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांच्या मदतीने नायट्रोजन प्लॅण्टमधून ऑक्सिजन तयार करण्यासंदर्भातील तंत्रज्ञान आणि शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश दिलेत. सध्या उत्तर प्रदेश सरकार रुग्णालयांना ६३१ टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. प्रामुख्याने गुजरातमधील जामनगर, पश्चिम बंगालमधील दुर्गापुर, बारजोरा आणि ओदिशामधील रुरकेला येथून उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय.

“सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासंदर्भात आणि निर्मितीचे इतर मार्ग तपासून पाहिले पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी शनिवारच्या बैठकीमध्ये सांगितलं. आयआयटी कानपूरबरोबरच इतर संस्थांमधील तज्ज्ञांच्या संपर्कात राहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. नायट्रोजन प्लॅण्टमधून ऑक्सिजन बनवता येतो का यासंदर्भातील पर्याय तपासून पाहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे,” अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्यांनी दिल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

झाशी येथील युनिटमधून ऑक्सिजन निर्मिती सुरु करण्यात आलीय. तसेच तांत्रिक मदत मिळाल्यास साखर कारखान्यांमधूनही ऑक्सिजननिर्मिती करता येईल असं योगींनी म्हटलं आहे. यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करावी असं योगींनी अधिकाऱ्यांना सुचवलं आहे. तसेच राज्यामध्ये ज्या रुग्णालयांकडे द्रव्य स्वरुपात ऑक्सिजनचा साठा करण्याची यंत्रणा नाही तिथे ही यंत्रणा तातडीने बसवण्यासंदर्भातील हलचाली करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पुढील सहा महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्यात यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मात्र यासंदर्भात ट्विट करताना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत अकाऊंटवरुन नायट्रोजनपासून ऑक्सिजन निर्माण करण्यासंदर्भातील शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश योगींनी दिल्याचं सांगण्यात आलं आणि एकच गोंधळ उडाला.

ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोन वेगळे वायू असून एकातून दुसरा बनवता येत नाही असं अनेकांनी ट्विटरवरुन म्हटलं. योगींच्या नावाने चुकीचा अर्थ जाणारं वाक्य ट्विट केल्याने अनेकांनी योगी आदित्यनाथ यांना सोशल नेटवर्किंगवर ट्रोल केलं.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

एकीकडे आदित्यनाथ यांना ट्रोल केलं जात असतानाच दुसरीकडे त्यांचे अनेक समर्थक मुंबई आयआयटीमध्ये नायट्रोजन निर्माण करणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्माण केला जात असल्याच्या बातमीचा संदर्भ देताना दिसत आहे. मात्र नंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानेच योगी आदित्यनाथ याच्या वक्तव्यामध्ये सुधारणा करत नायट्रोजनपासून ऑक्सिजन नाही तर नायट्रोजन जिथे बनवला जातो त्या प्लॅण्टमधून ऑक्सिजन निर्माण करण्यासंदर्भातील चाचपणीचे आदेश दिल्याचं बरोबर ट्विट केलं.

या एका चुकीमुळे नेटकऱ्यांना मात्र मोठा विषय मिळाला असून नायट्रोजन या शब्दासंर्भात साडेतास हजारांहून अधिक ट्विट काही तासात करण्यात आलेत.

Story img Loader