एप्रिल फूल बनवण्याचा मक्ता काय काही लोकांपुरताच आहे का? कोणीही वाट्टेल त्याला फूल करू शकतो. मग अशी टवाळी करण्यात माध्यमही सामील झाली तर चालतं म्हणे

पाकिस्तानमधल्या ‘एक्सप्रेस ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने संंपूर्ण पाकिस्तानची खेचायचं ठरवलं आणि एक भन्नाट बातमी छापली. ही बातमी एप्रिल फूलची होती. पण ती बातमीच एवढी भयानक होती.

इस्लामाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं नाव देण्यात  येणार असल्याची बातमी या पेपरमध्ये छापण्यात आली होती. पण पाकिस्तानमध्ये अनेकांना हा जोक कळलाच नाही. सगळ्यांना वाटलं की खरोखरच पाकिस्तानच्या राजधानीमधल्या विमानतळाला चिनी अध्यक्षांचं नाव देण्यात येणार आहे. आणि यामुळे प्रचंड हलकल्लोळ झाला. आता मुंबईच्या विमानतळाचं नाव व्लादिमीर पुतिन असं करायंचं ठरवलं तर आपल्याला कसं वाटेल.

वास्तविक पाहता या पेपरने य़ा लेखाच्या शेवटी हा एप्रिल फूलचा जोक आहे असं सांगितलं होतं खरं. पण क्लिकच्या जमान्यामध्ये एखादा लेख संपूर्णपणे वाचायची तसदीच कोण घेतो? त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारण्यांपासून  कलाक्षेत्रातल्या अनेक लोकांनी इंटरनेटवर धडाधड आपल्या प्रतिक्रिया टाकायला सुरूवात केली. या सगळ्या राजकारण्याचं कलाकारांचं प्रचंड हसं झालं. पाकिस्तानमधली एक प्रसिध्द माॅडेल राबिया बट हिनेसुध्दा फक्त  हेडलाईन वाचत खूपच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि एरव्ही तिच्या एका अदेवर घायाळ होणारे तिचे फॅन्स तिच्यावरच जोक मारू लागले. तिने इन्स्टाग्रॅमवर टाकलेल्या  प्रतिक्रियेवर तिच्या चाहत्यांच्या काॅमेंट्स त्यावर क्लिक करून पाहा.

तर तात्पर्य काय तर डिजिटल युगातही बातमी संपूर्ण वाचा आणि मगच आपलं मत व्यक्त करा.

Story img Loader