Shcoking video: नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायकोनं आपल्या नवऱ्याला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जसं नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं तसंच प्रियकर आणि प्रियसीचं नातं असतं. आज काल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Nita Ambani dazzled at Donald Trump’s pre-inauguration reception in Washington DC, showcasing Indian artistry through a Kanchipuram sari by National Award-winning artisan B. Krishnamoorthy and heritage jewelry.
Nita Ambani : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात नीता अंबानींनी परिधान केला १८ व्या शतकातील रत्नहार, साडी लूकचीही चर्चा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!
saif ali khan autodriver got money
जखमी सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाला देण्यात आलं बक्षीस, मिळाली ‘इतकी’ रक्कम
Rajasthan Teacher shocking Video viral
शिक्षकांनी सोडली लाज! शाळेच्या स्टाफ रूममध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लील चाळे; मिठी मारली अन्…; धक्कादायक VIDEO VIRAL
Digital arrest scammer
शेअर मार्केटमधून ५० लाखांचे ११ कोटी कमावले; डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये सगळे गमावले
Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
broken engagement in rajasthan
सद्दाम झाला शिवशंकर; तरुणीनं बलात्काराचा गुन्हा दाखल करताच मुस्लीम तरुणानं लग्नासाठी बदलला धर्म

झाशीतील एका घटनेने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बायकोने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच शिवीगाळ करत चोप दिल्याचे दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी पत्नीने खूप गोंधळ घातला आणि रागाच्या भरात नवऱ्याच्या कानाखालीही मारली. मात्र या व्हिडीओमध्ये नवऱ्यापेक्षा त्याच्यासोबत असलेली गर्लफ्रेंडचं त्याच्या बायकोचं खतरनाक रुप बघून घाबरली आहे. ती हात जोडून माफीही मागताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरा अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता आणि बायको सतत त्याचा पाठलाग करत होती. यावेळी बीकेडी चौकात बायकोने नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिल्याने ती दोघांवर भडकली आणि भररस्त्यात त्यांना मारहाण करू लागली.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटर @ManojSh28986262 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्य खूप छोटं आहे, विश्वास आणि प्रेमाने नाती जपा. जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका. धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजूबत होतं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.

Story img Loader