सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ सर्वांना आश्चर्यचकित करतात. काही व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणतात. सध्या एका ऑक्टोपसचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऑक्टोपसला अनेकदा शांत असलेले तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही त्यांना कधी डान्स करताना पाहिलंय का ? होय. असा प्रश्न केल्यानंतर तुम्ही मनात विचार करत असाल की ऑक्टोपस डान्स करत असेल तर तो कसा दिसत असेल, कशा पद्धतीने डान्स करत असेल? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. अतिशय दुर्मिळ असलेल्या ब्लॅंकेट ऑक्टोपसने इतका भन्नाट डान्स केलाय की बघणारेही थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ग्रेट बॅरियर रीफ या महासागरातला आहे. या महासागरात क्वचितच दिसून येत असलेला ब्लॅंकेट ऑक्टोपस हा पाण्यात डान्स करतान दिसून येतोय. ग्रेट बॅरियर रीफच्या दक्षिणेकडील टोकाला आढळणारी कोरल वेल लेडी इलियट बेटाच्या किनाऱ्यावरून पोहताना जॅसिंटा शॅकलटन नावाच्या महिलेला गुरुवारी हा मादी ब्लँकेट ऑक्टोपस दिसून आला. फिक्या लाल रंगात असलेल्या हा ब्लॅंकेट ऑक्टोपस समुद्राच्या निळाशार पाण्यात पोहत पोहत डान्स करताना दिसून येतोय. हे दृश्य खरोखरंच मन सुखावणारे आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बादशाहच्या ‘सजना’ गाण्यावर विदेशी ‘डान्सिंग डॅड’नी केला जबरदस्त डान्स
याचा व्हिडीओ जॅसिंटा शॅकलटन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्या एक सागरी जीवशास्त्रज्ञ आहेत. पाण्यात पोहत असताना त्यांनी पाहिलेलं हे दृश्य चकित करून सोडणारं होतं. “जेव्हा मी पहिल्यांदा तो पाहिला तेव्हा मला वाटलं की तो लांब पंख असलेला मोठा मासा असू शकतो, पण जसजसा तो जवळ आला तेव्हा मला समजलं की तो एक मादी ब्लँकेट ऑक्टोपस आहे. हे पाहून मला खूप आनंद आणि उत्साह वाटला,” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
‘द गार्डियन ऑस्ट्रेलिया’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी माझ्या स्नॉर्केलमधून ओरडत राहिले, ‘हा एक ब्लँकेट ऑक्टोपस आहे!’ मी इतकी उत्साहित होते की खाली उतरण्यासाठी मला माझा श्वास रोखणं कठीण होत होतं, पण तरीही मी त्याचा व्हिडीओ काढत होती.” ब्लॅंकेट ऑक्टोपस हा क्वचितच दिसणारा ऑक्टोपस आहे. रिबन रीफमधील ग्रेट बॅरियर रीफच्या अगदी उत्तरेस डॉ ज्युलियन फिन यांनी २१ वर्षांपूर्वी जिवंत नर ब्लँकेट ऑक्टोपसचे पहिले दर्शन घडवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा समोर दिसून आला. शेकलटनचा असा विश्वास आहे की तिच्या आधी या भागात ब्लँकेट ऑक्टोपसचे फक्त तीन वेळा दर्शन झाले आहे.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : चक्क सापासोबत खेळायला निघाला होता, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल
ब्लँकेट ऑक्टोपस सामान्यत: खुल्या समुद्रात आपले जीवनचक्र घालवतो, त्यामुळे रीफवर दिसणे फारच असामान्य आहे. मादी ब्लँकेट ऑक्टोपसची लांबी दोन मीटरपर्यंत वाढू शकते, तर नर केवळ 2.4 सेंटीमीटरपर्यंत वाढतात. विशेष म्हणजे, नर देखील रंगीबेरंगी, इंद्रधनुषी ‘ब्लँकेट’ विकसित करत नाहीत, ज्यामुळे प्राण्याला त्याचे नाव दिले जाते. भक्षकांपासून दूर जाण्याचा मार्ग म्हणून मादींमध्ये घोंगडी टाकण्याची क्षमता असते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओ पाहून लोक उत्साहित झाले असून त्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाख लोकांनी पाहिला असून २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे.