Thane Student Drives Car video: सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीसंदर्भातही असतात. वाहतूक पोलिस विभागाकडून रस्त्याने वाहन चालवण्यासंदर्भात काही नियम आणि अटी लागू केल्या गेल्या आहेत. मात्र, अनेक नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून बेशिस्तीने वाहन चालवताना दिसतात. रोड सेफ्टी अर्थात् रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. यामुळेच अल्पवयीन मुलांना ड्रायविंग पासून रोखण्यासासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे. अशातच आता ठाण्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून लोक चांगलेच संतापले आहेत.

एक शालेय विद्यार्थी त्याच्या पाच मित्रांसह महिंद्रा कार चालवतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ठाण्यातील न्यू होरायझन शाळेच्या बाहेर, आनंद नगर येथील कावेसरजवळचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगा स्टीअरिंग हाताळताना आणि गाडी चालवताना दिसत आहे. शाळेचा गणवेश घातलेला हा विद्यार्थी गाडीत शाळेतील मित्रांसह ट्रॅफिकमधून प्रवास करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक लहान मुलगा रस्त्यावर हातात महिंद्रा कारचं स्टेअरिंग घेत चालवताना दिसत आहे. अवघ्या सहा-सात वर्षांचा तो मुलगा अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवत होता; ज्यामुळे अपघात होऊन हानी होण्याची शक्यताही होती. लहान मुलांना गाड्यांचे आकर्षण जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र १८ वर्षांखालील मुलांना सरकारी नियमानुसार गाडी चालवायला बंदी आहे. तरीही या मुलाच्या हातात पालकांनी गाडीचे स्टेअरिंग दिले असून, मुलगा भरट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना आपल्याला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून ती सोशल मीडियावर शेअर केली

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @safecars_india या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.एका युजरने लिहिले, “श्रीमंत लोक काहीही करू शकतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “”स्वत:च्याच लेकरांचा का जीव घेताय?” तिसरा म्हणतो, “या प्रकरणी गंभीर कलमे लावून कारवाई करणे गरजेचे आहे.” तर आणखी एकानं, “पालकांनी मुलांना रस्त्यावर गाडी कशी नेऊ दिली” तसेच या प्रकरणात पोलिस कारवाईची मागणी केली आहे.