Viral video: खराब हवामानामुळे अनेकदा विमाने कोसळली आहेत. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत. याआधी तुम्ही एअर शो दरम्यान स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. स्कायडायव्हिंग करून आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करून लोक साहसाचा आनंद घेतात. दरम्यान, एअर शोचा असा एक व्हिडिओ अमेरिकेतून समोर आला आहे, जो तुम्हाला थक्क करेल. कारण एअर शो दरम्यान अमेरिकेतून विमान क्रॅश झालं. जीव वाचवण्यासाठी विमानातील लोकांनी खाली उड्या घेतल्या.
जे विमान क्रॅश झालं त्यामध्ये दोन लोक होते जे थोडक्यात बचावले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की विमान उड्डाण करत असताना पायलट आणि विमानातील अन्य एक व्यक्ती बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचे पॅराशूट उघडले. हा व्हिडिओ अतिशय धोकादायक आहे. हा व्हिडीओ थंडर ओव्हर मिशिगन एअर शोचा आहे, ज्यामध्ये समुद्रावर विमान जाताच अचानक स्फोट झाल्याचे दिसत आहे, त्यानंतर पायलट आणि त्यात बसलेल्या अन्य व्यक्तीला बाहेर काढले जाते आणि ते पॅराशूटच्या मदतीने खाली येतात. ते विमान काही अंतरावर जात असतानाच स्फोट होतो, विमानाच्या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – पार्किंगवरून वाद! दारू पिऊन तरुणानं रॉडने सुरक्षा रक्षकाचं थेट डोकं फोडलं, दिल्लीतील धक्कादायक Video Viral
मीडिया रिपोर्ट्सनुसार पॅराशूटच्या मदतीने विमानातून खाली उतरलेले दोघेही सुखरूप असून खबरदारी म्हणून त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. अपघातापूर्वी पायलट आणि मागच्या सीटरने विमानातून यशस्वीरित्या बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी दोघांनी उड्या मारल्यानंतर विमान एका पार्किंगमधील वाहनांवर जाऊन धडकले. दरम्यान या एअर शो अपघतात कोणीही जखमी झाले नाही.
@ics923 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेतय