सोशल मीडियावर फेसबुक सर्वात लोकप्रिय माध्यम असून सर्वाधिक युजर्स आहेत. आज जगभरातील २.८ अब्जाहून अधिक सक्रिय युजर्स फेसबुक वापरतात.फेसबुकचे फाउंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. मार्क झुकरबर्ग यांचा जगातील दहा श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुकची मक्तेदारी आहे. व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया फेसबुक अंतर्गत येतात. मात्र असं असलं तरी, मार्क झुकरबर्ग यांचा मासिक पगार तुमच्या आमच्यापेक्षा कमी आहे. एकीकडे पगार कमी असताना त्यांच्या सुरक्षेवर अब्जावधी रुपये खर्च केले जात आहे. हजारो लोकांच्या पगाराइतका खर्च सुरक्षेवर केला जात आहे.
सीईओ म्हणून मार्क झुकरबर्ग यांचा मूळ पगार फक्त १ डॉलर (सुमारे ७५ रुपये) आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या मते, पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना एकच शुल्क असावे. त्यामुळे त्यांचा मूळ पगार खूपच कमी आहे. गतवर्षी त्यांनी बोनसची रक्कमही घेतली नाही. मात्र असं असलं तरी वर्ष २०२० मध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या सुरक्षेसाठी २३.४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १ अब्ज ७६ कोटी रुपये) खर्च करण्यात आले. कंपनीच्या वार्षिक कार्यकारी भरपाई अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मार्क झुकरबर्गच्या कौटुंबिक सुरक्षेसाठी कंपनीने करपूर्व वार्षिक भत्ता म्हणून १० दशलक्ष डॉलर्स दिले होते. फाइलिंगनुसार, फेसबुकने मार्क झुकरबर्गच्या सुरक्षेवर १३.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले. यामध्ये त्याचे निवासस्थान आणि प्रवास सुरक्षा खर्चाचा समावेश आहे. फेसबुकची मुख्य कार्यकारी अधिकारी शेरिल सँडबर्ग यांच्या सुरक्षेसाठी २०२० मध्ये ७.६ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले.
Jio Plan: जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा
२००३ मध्ये मार्क झुकरबर्ग हे हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी होते. मार्क यांनी सुरुवातीपासूनच कॉम्प्युटर प्रोग्रामिंग क्षेत्रात प्रभुत्व मिळवले होते. २००३ मध्ये मार्कने हार्वर्ड स्टुडंटचा डिरेक्टरी सर्व्हर हॅक केला आणि त्यातील सर्व प्रोफाईल एकत्र करून फेसमास नावाची नवीन साइट तयार केली. या मजेदार व्यासपीठावर सुंदर मुलींचे फोटो टाकले जायचे आणि त्यांपैकी कोण अधिक आकर्षक आहे?, यासाठी वोटिंग होत असे. हॉवर्डच्या व्यवस्थापनाला याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वेबसाइट बंद केली. यानंतर २००४ वर्षाच्या सुरुवातीला, मार्क झुकरबर्ग यांनी तीन सहकाऱ्यांसोबत (ड्यूस्टिन मॉस्कोविट्झ, एडुआर्डो सेव्हरिन आणि ख्रिस ह्यूजेस) भागीदारीत Facebook.com सुरू केले.