जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा या कंपनीचे सीईओ व संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यामुळे आपण घरबसल्या एकेमकांशी जोडले गेलो आहोत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी ॲप्सवर आपण मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर हवा तेवढा संवाद साधून, कामानिमित्त इतर गोष्टीसुद्धा करू शकतो आहोत. तर, मार्क झुकरबर्ग सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात आणि नवनवीन गोष्टी इतरांबरोबर शेअर करीत असतात. आज त्यांनी फेसबुकचा प्रवास दाखविणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
तर, २००४ साली फेसबुकची सुरुवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मार्क झुकरबर्ग यांनी स्वतःचा २० वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो व एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये फेसबुकचा २० वर्षांचा प्रवास दाखविण्यात आला आहे. व्हिडीओत सगळ्यात पहिला मार्क झुकरबर्ग यांचा संगणकावर काम करतानाचा फोटो आहे. तेव्हा ते कॉलेजचे विद्यार्थी होते, जेव्हा त्यांनी फेसबुक सुरू केले होते. त्यानंतर अनेक कर्मचारी, सेलिब्रेशन, फेसबुक कंपनी, प्रवासात साथ देणारी खास माणसे, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम अॅप, मुलाखती यांची झलक तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल. एकदा पाहाच मार्क झुकरबर्ग यांचा हा अनोखा प्रवास.
व्हिडीओ नक्की बघा :
तसेच या प्रवासाबद्दल सांगताना मार्क झुकरबर्ग म्हणाले की, २० वर्षांपूर्वी मी एक गोष्ट सुरू केली. या प्रवासात बरेच लोक सहभागी झाले आणि आम्ही आणखी काही अद्भुत गोष्टी तयार केल्या. आम्ही अजूनही त्यावर काम करीत आहोत. तसेच बऱ्याच खास गोष्टी येणे अजून बाकी आहेत, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.
सोशल मीडियावर या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ मार्क झुकरबर्ग यांच्या @zuck या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. तसेच मार्क झुकरबर्ग यांचा फेसबुकबरोबरचा हा अनोखा प्रवास पाहून अनेक जण कमेंट्समध्ये त्यांचे अभिनंदन आणि त्याच्या २० वर्षांच्या प्रवासाचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत.