फेसबुक सध्या दोन नवे फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. या फीचर्सचे नाव आहे ‘Live Chat With Friends’ आणि ‘Live With’. युजर्सने लाईव्ह व्हिडिओ पर्यायाचा वापर अधिकाअधिक चांगल्या प्रकारे करावा यासाठी हे दोन नवे पर्याय देण्यात आलेत. आता या दोन पर्यायाचा नेमका युजर्सना फायदा कसा होणार आहे हे पाहुयात. ‘Live Chat With Friends’ या पर्यायाचा वापर करून युजर्स लाईव्ह स्ट्रिमिंग होत असताना आपल्या मित्र मैत्रिणींसोबत चॅट करु शकतात, यापूर्वीच एखादा व्हिडिओ लाईव्ह होत असेल तर त्यावर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया यायच्या, पण आता या पर्यायामुळे तसं होणार नाही. समजा फेसबुकवर एखादा व्हिडिओ लाईव्ह होत असेल तर तुम्ही तुमच्या निवडक मित्र मैत्रिणींना तो पाहण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. तसेच फेसबुकवरच्या निवडक मित्र मैत्रिणींशी तुम्ही गप्पाही मारू शकता.

तर ‘Live With’ या पर्यायाचा वापर करून इतरही युजर्सना तो व्हिडिओ पाहता येणार आहे. लॅण्डस्केप आणि पोर्ट्रेट अशा दोन्ही फ्रेममध्ये या व्हिडिओच चित्रिकरण करता येणार आहे. तेव्हा तुमचे व्हिडिओ कोणी पाहावेत आणि कोणी नाही यासाठी ‘Live Viewers section’ मधून तुम्ही मित्र मैत्रिणींची ही यादी निवडू शकता. तुर्तास तरी मोबाईलमध्ये हे फीचर्स उपलब्ध होईल.

Viral : हा व्हिडिओ पाहण्यासाठी मन घट्ट करा!

Viral Video : भक्ष्य समजून सापाने गिळली प्लॅस्टिकची बाटली

Story img Loader