Vishalgad Encroachment : लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळून आलाय. या व्हिडीओद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व कोल्हापूरचे काँग्रेस खासदार, छत्रपती शाहू महाराज यांनी विशाळगड येथील दर्गा पाडल्यानंतर मुस्लिम समुदायाच्या सदस्यांची कान धरून माफी मागितली, असा दावा केला जात आहे. त्यावरून अनेक राजकीय वर्तुळांत विविध चर्चांना उधाण आले आहे. पण, आम्ही याबाबतच्या तपासातून या व्हिडीओची खरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Anand Varma ने व्हायरल पोस्ट दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केली आहे.

इतर वापरकर्तेदेखील हाच दावा करीत पोस्ट शेअर करीत आहेत.

तपास :

व्हायरल दाव्यांसह शेअर केला जात असलेला फोटो आम्ही रिव्हर्स इमेजने सर्च केला. त्यावेळी आम्हाला एक्सवर कॉमरेड नावाच्या युजर्सची एक पोस्ट सापडली; ज्याने पोस्ट केलेय की, फोटोतील एक महिला खासदारांना तिच्या चोरीला गेलेल्या कानातल्यांबद्दल माहिती देत आहे.

त्यानंतर आम्ही एक्सवर कीवर्ड शोध घेतला, तेव्हा आम्हाला ॲड्. आनंद दासा यांची एक पोस्ट सापडली.

पोस्टमध्ये उल्लेख : काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील यांनी विशाळगडमध्ये जाऊन समाजकंटकांचा डाव हाणून पाडला. म्हणून छत्रपतींची या ना त्या कारणाने बदनामी सुरु आहे.

त्यानंतर आम्ही मराठीत एक कीवर्ड शोधला आणि पाच दिवसांपूर्वी ‘मुंबई तक’च्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळला.

या व्हिडीओचे शीर्षक होते : छत्रपती शाहू महाराजांना महिलांचा घेराव, विशाळगड गजापूरमध्ये पोहोचताच टाहो फोडला, सगळा थरार सांगितला

या व्हिडीओमध्ये एक मिनीट ४० सेकंदांच्या आसपासच्या काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज कानाला हात लावून महिलेच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. व्हिडीओ लक्षपूर्वक ऐकल्यानंतर, ती महिला असे म्हणताना ऐकू आले, “ते तिच्या घरात घुसले आणि त्यांनी तिच्या कानातले हिसकावून घेतले.” (इसके घर में घुस कर कान में से इसका निकाल के ले गये).

हा व्हिडीओ गजापूरचा असल्याचे शीर्षकात नमूद करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर गावात अलीकडेच जातीय हिंसाचाराचा भडका उडाला होता. तसेच जाळपोळ आणि दगडफेकीची घटनादेखील घडली होती.

https://timesofindia.indiatimes.com/city/aurangabad/members-of-minority-community-protest-against-communal-violence-in-gajapur-village/articleshow/111874308.cms

निष्कर्ष :

कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी कान धरून मुस्लिम समाजाची माफी मागितली नाही. एक महिला तिचे कानातले कसे हिसकावून घेतले गेले याचा एक प्रसंग सांगत होती. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:च्या कानाला हात लावून त्यासंबंधी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे व्हायरल झालेले दावे दिशाभूल करणारे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fack check congress mp chhatrapati shahu maharaj did not seek apology to minority muslim community on vishalgad sjr