Fact check: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्पॅनिश फॅशन ब्रँड झारा विरोधात अमेरिकन लोक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच लोक झारा कंपनीसमोर कपडे फेकून देत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. झाराने कंपनीच्या जाहिरातीसाठी काही फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये गाझामधील हमास विरुद्ध इस्रायलच्या युद्धाचा संदर्भ जाणवत असल्याचा आरोप लोकांनी केला आहे.

जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या फोटोंमध्ये ‘unfinished sculptures in a sculptor’s studio’ असे लेबल असलेल्या दृश्यांचा समावेश होता. तसेच यातील एका फोटोमध्ये गाझा नागरिक त्यांच्या मृत मुलाला घेऊन जात असल्यासारखे दृश्य दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर सोशल मीडियावर अनेकांनी या फोटोवरुन झारा कंपनीवर टीका केली आहे. परंतु, या जाहिरातीशी संबंधित वाद सुरु झाल्यापासून, झारा कंपनीसमोर लोक कपडे फेकून देत आहेत, यामुळे कंपनीसमोर कपड्यांचे ढीग लागल्याचा व्हिडीओ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओचा तपास केला असता, तो AI द्वारे बनवलेल्या वेस्टिएअर कलेक्टिव्हची जाहिरात असल्याचे आढळून आलं.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Singapore flagged cargo vessel near Colombo beach in Sri Lanka Fact Check
हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

नेमकं काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर @halfadalah ने व्हायरल व्हिडीओ त्याच्या प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लोकं कंपनीसमोर कपडे फेकून देताना दिसत आहेत.

इतर नेटकरी देखील हाच व्हिडीओ आपापल्या प्रोफाइलवर शेअर करत आहेत.

तपास :

सर्वात आधी आम्ही हा व्हिडीओ डाउनलोड केला आणि InVid टूलमध्ये अपलोड करून तपास सुरू केला.

यामुळे आम्हाला व्हिडीओमधून असंख्य स्क्रीन ग्रॅब्स मिळाले. आम्ही प्रत्येक की फ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केलं, जो InVid टूलद्वारे मिळवला.

यामुळे आम्हाला ITP Live नावाच्या वेबसाईट वर एक आर्टिकल मिळाले.

https://itp.live/news/global/vestiaire-collectives-fast-fashion-campaign

या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या, लेखामध्ये वेगवान फॅशनच्या प्रभावांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वेस्टिएअर कलेक्टिव्हची चालणारी मोहीम वैशिष्ट्यीकृत आहे. या लेखात व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून अगदी तशाच दिसणाऱ्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट दाखवण्यात आला आहे.

आम्हाला या जाहिरात मोहिमेबद्दल आणखी काही लेख सापडले.

https://tabitha-whiting.medium.com/vestiaire-collectives-think-first-buy-second-campaign-is-an-example-of-great-sustainability-9516738964ee

View at Medium.com

Vestiaire Collective च्या YouTube चॅनेलवर आम्हाला नेमका तोच व्हिडीओ सापडला. जो १६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या व्हिडीओमध्ये, ‘परिपत्रक चळवळीत सामील व्हा आणि फास्ट फॅशन वेस्ट समाप्त करण्यात आम्हाला मदत करा’ असा उल्लेख असल्याचं आढळलं.

निष्कर्ष : व्हायरल व्हिडीओ ज्यामध्ये, अमेरिकन लोक त्यांचे झाराचे कपडे फेकून देत आहेत, हा दावा खोटा असून व्हायरल व्हिडीओ, Vestiaire Collective ची AI द्वारे निर्मीत केलेली जाहिरातीची मोहीम आहे, जी लोकांना फास्ट फॅशन संपवण्यास प्रोत्साहित करते.