WHO Call For Military To Round Up Refusers Vaccine During Bird Flu Pandemic : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात, पण कधी कधी या व्हायरल व्हिडीओ किंवा फोटोची दुसरी बाजू आपल्याला माहिती नसते. एखाद्या व्यक्तीनं एखादा व्हिडीओ शेअर केला की, त्याच कॅप्शनसह तो अनेकांकडून रिपोस्ट केला जातो आणि मग खरं काय, खोटं काय ही गोष्ट बाजूलाच राहते. तर आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात एक पोस्ट शेअर केली जात आहे. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जागतिक आरोग्य संघटने (WHO) बरोबर एकत्र आले आहेत. बर्ड फ्लूच्या साथीच्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी mRNA लस किंवा व्हॅक्सिन घेण्यास नकार देणाऱ्यांना सैन्याद्वारे पकडले जाते आहे, असे आव्हान करण्यात आले आहे.

तर याचा तपास घेताना ‘द पीपल्स व्हॉईस’ या वेबसाईटद्वारे हे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. काही पोस्ट्स आम्हाला त्या लेखाच्या स्क्रीनशॉटसह आढळल्या. इतर सोशल मीडिया वापरकर्ते व्हायरल दाव्यांसोबत त्याच लेखाचा स्क्रीनशॉट रिशेअर करत आहेत. तपासादरम्यान आम्हाला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

तर नेमकं काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या @JimFergusonUK या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, सैनिक आणि जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी यांचा एक मर्ज केलेला फोटो आहे.

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

असेच वृत्त इतर विश्वसनीय माध्यम संस्थांनी प्रकाशित केले आहे का, हे शोधून आम्ही आमचा तपास सुरू केला. असे सांगणारा कोणताही लेख आम्हाला आढळला नाही.

तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील या चुकीच्या माहितीबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा आपलं मत मांडलं आहे… ते म्हणाले की, “सगळ्यात पहिले आम्ही हे सांगू इच्छितो की, हे दोन्ही दावे स्पष्टपणे खोटे आहेत. यावर जोर दिला पाहिजे की, विज्ञान व आरोग्याशी निगडित विषयांवरील हानिकारक, खोटे दावे वाढत चालले आहेत. त्यामुळे असे खोटे दावे लोकांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर परिणाम करू शकतात.

WHO संस्था या राष्ट्रांना तांत्रिक सल्ला, मदत प्रदान करते. आम्ही त्यांच्या आरोग्याबाबत निर्णय घेतो आणि त्यावर कृती करतो. या आरोपांमध्ये नमूद केल्याप्रमाणे WHO ने सैनिकांना यामध्ये सहभागी केलेलं नाही किंवा WHO कडे लसीकरण आदेश लागू करण्याची क्षमता नाही, त्यामुळे हा दावा पूर्ण खोटा आहे.

डब्ल्यूएचओचे कम्युनिकेशन डायरेक्टर गॅबी स्टर्न यांनी एक्स (ट्विटर)च्या @gabbystern या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली.

या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या आहेत की, “हे दावे खोटे आहेत. हे खूप धक्कादायक आहे की, विज्ञान व आरोग्याविषयी अशा गोष्टी पाहून लोक त्यांच्या आरोग्याबद्दल व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या गोष्टींना ॲम्प्लिफाई करतात. या सर्व गोष्टींमुळे जगभरात लसीकरण संख्येमध्ये घट झाली आहे, ज्याचा परिणाम म्हणजे रोगांचा प्रसार; जसे की, मुलांमध्ये गोवर या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कृपया खोटे बोलणे बंद करा, कृपया विज्ञान, आरोग्याविषयी डॉक्टरांशी बोलून निर्णय घ्या.

डॉक्टर मारिया व्हॅन केरखोव्ह, डायरेक्टर एआय एपिडेमिक अँड पँडेमिक प्रिपैरेडनेस अँड प्रेव्हेंशन यांनीसुद्धा एक्स (ट्विटर) वर पोस्ट केले आहे.

त्या म्हणाल्या, “मी जगभरातील शास्त्रज्ञांबरोबर बर्ड फ्लूचा विषाणू H5N1 वर काम करत आहे. सोशल मीडियावर खोटे दावे पसरवले जात आहे. तसेच WHO कडे कोणालाही अटक करण्याचा अधिकार नाही. WHO हे करण्यासाठी सरकारबरोबर काम करत असल्याचा दावा खोटा आणि धोकादायक आहे.”

त्यानंतर आम्ही ‘Stopaganda Plus’ या क्रोम एक्स्टेंशनद्वारे वेबसाइट सर्च केली. याद्वारे आम्हाला कळले की, ‘द पीपल्स व्हॉईस’ ही वेबसाइट विश्वासार्ह नाही,त्यामुळे व्हायरल होणारी पोस्ट खोटी आहे, असे स्पष्ट होत आहे.