देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यात कर्नाटक राज्याचाही समावेश आहे. रविवारी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस झाला. संपूर्ण शहर पाण्यात बुडालेले दिसले. इथल्या पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढणे एक आव्हानच होते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात पावसामुळे मगर शहरात घुसल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण घाबरून गेले आहेत. या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य नेमकं काय आहे, जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मगर पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून चालताना दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या मगरीला अनेकजण छतावर उभे राहून पाहत आहेत. मात्र या घटनेची माहिती मिळताच याचं वास्तव समोर आलं आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : स्मार्टनेसच्या बाबतीत कुत्रेही काही कमी नाहीत, पाहा पायऱ्यांवरून कसा भरभर उतरला!

ही घटना खरी असली तरी बंगळुरूची नाही, असे फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. या व्हिडीओबाबत आणखी चौकशी केली असता असं आढळलं की, हा व्हिडीओ बंगळुरचा नसून मध्य प्रदेशमधील शिवपुरीचा आहे.

आणखी वाचा : लाकडी काठ्यांपासून बनवला बुलडोझर, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

रिव्हर्स इमेज सर्चमध्ये ट्विटरवर एक पोस्ट सापडली, ज्याचा व्हिडीओ शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ १४ ऑगस्ट २०२२ रोजी पंकज अरोरा नावाच्या एका यूजरने शेअर केला होता. ‘शिवपुरी एमपीमध्ये मगर’ अशा कॅप्शनसह व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता.

आणखी वाचा : हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हत्ती फिरताना दिसले, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हिजाब घालून ओणम साजरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा VIDEO VIRAL

बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला असून बहुतांश रस्ते जलमय झाले असले तरी मगरीचा हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. अशा परिस्थितीत सत्य हे आहे की हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील असून बेंगळुरूबाबत करण्यात येत असलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

Story img Loader