Fact Check Drone show practice for Ayodhya Ram Mandir inauguration: अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी(सोमवारी) राम मंदिराचे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मंदिरामध्ये प्रभु श्री रामाच्या मु्र्तीची प्राण-प्रतिष्ठा केली जाईल. देशभरातील सर्वांनाच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. त्यानिमित्त देशभरातील भाविक आनंद साजरा करत आहे. कोणी राम भजन गाऊन आंनद व्यक्त करत आहे तर कोणी नृत्य करून आनंद व्यक्त करत आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरासाठी मूर्तीच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी, एका जबरदस्त ड्रोन शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी हा ड्रोन शोचा सराव केला जात असल्याचा दावा या व्हिडीओबाबत करण्यात आला आहे. पण व्हिडीओ खरी बाजू आता समोर आली आहे. चला जाणून घेऊ या सविस्तर

काय आहे दावा?

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनी असा दावा केला आहे की, “हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ड्रोन शोकचा सराव करतानाचा आहे पण…? हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ नोव्हेंबर २०२३ चा आहे आणि जेव्हा दिवाळीच्या वेळी भारतीय स्टार्टअप BotLab Dynamics द्वारे हा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – ‘राम आएंगे’ गाण्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांसह केले नृत्य; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

काय आहे व्हायरल व्हिडीओचे सत्य?

व्हायरल व्हिडीओची सत्यता तपसण्यासाठी जेव्हा गुगलवर शोध घेतला तेव्हा १२ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर केलेल्या ‘BotLab Dynamics’ इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केलेला खरा व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ कॅप्शनसह शेअर केला होता, ज्यात दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या आणि दिवाळीशी संबंधित हॅशटॅग वापरला आहे.

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये बॉटलॅबचा व्हिडिओ शेअर केला होता. तुम्ही त्यांची पोस्ट इथे पाहू शकता.

हेही वाचा – पुण्यात एकाच रिक्त जागेसाठी लागली हजारो लोकांची रांग; नोकरीसाठी धरपडणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

त्यांच्या वेबसाइटनुसार, १०० ते ३५०० ड्रोन वापरून BotLab Dynamics चे ड्रोन लाइट शो कुठेही सादर करू शकतात, जो नजरेला स्पष्ट दिसेल अशा स्वरुपात असतात ज्यामध्ये ड्रोन थ्रीडी स्पेसमध्ये उड्डाण करताना दिसतात”

कंपनीने अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. २०२३ इंडियन प्रीमियर लीग उद्घाटन समारंभ आणि भारताचा आर्मी डे निमित्त त्यांनी ड्रोन शो सादर केला होता. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर, BotLab Dynamics ने २२ जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात झालेल्या अभिषेक सोहळ्याशी संबंधित दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, मंदिराच्या उद्घाटनात सहभागी होणार की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

हेही वाचा – Video : ‘राम आएंगे…’; जर्मन गायिकेने गायले श्री रामाचे भजन! पीएम मोदींनी केले कौतुक, म्हणाले,”सुरेल आवाज…”

निष्कर्ष: नोव्हेंबर २०२३ च्या ड्रोन लाइट शोचा व्हिडिओ अयोध्येच्या राम मंदिरातील मूर्तीच्या आगामी अभिषेक सोहळ्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला जात आहे.

Story img Loader