इस्त्रायलच्या सैन्याने अलीकडेच लेबनॉनवर रात्रीत हल्ला सुरू केला आणि हिजबुल्लाहचा शस्त्रास्त्रे साठवण्याच्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले. दरम्यान लाइटटहाऊस जर्नलिझमच्या समोर एक असा दावा आहा जो या संघर्षाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला बेकायदेशीर राष्ट्र घोषित केल्याचा दावा केला जात आहे. जगभरात सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता मिळू नये, असा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तपासादरम्यान हा दावा खोटा असल्याचे आढळले. दाव्यासह दिशाभूल करणारा व्हिडिओ जुना आहे हे देखील स्पष्ट झाले.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर फैज अहमद तरारने हा व्हायरल दावा त्याच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.
इतर वापरकर्त्यांनी देखील असाच दावा शेअर केला.
तपास:
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नमूद केलेल्या दाव्याबद्दलच्या बातम्या पाहिल्यानंतर कोणतेही अलीकडील अहवाल सापडले नाहीत, पण वेबवरील बातम्या आणि व्हिडिओ जुलै, २०२४ चे आहेत.
अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्याऐवजी पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलची उपस्थिती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.
https://www.aljazeera.com/news/2024/7/19/world-court-says-israels-settlement-policies-breach-international-law
अहवालात म्हटले आहे: आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ने असा निर्णय दिला आहे की,”व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलची सतत उपस्थिती बेकायदेशीर आहे आणि “शक्य तितक्या लवकर” तीसंपली पाहिजे. इतर राष्ट्रांनी इस्त्रायलच्या भूभागात अस्तित्व कायम राखण्यासाठी “मदत देऊ नये” असे म्हटले आहे. ICJ अध्यक्ष नवाफ सलाम यांनी वाचलेल्या ८० पेक्षा जास्त पानांच्या सारांशानुसार, न्यायालयाने म्हटले आहे की,”इस्रायलने वसाहती बांधणे थांबवावे आणि त्यांना हटवले पाहिजे.”
हेही वाचा –Ratan Tata Quotes: यशाचे दुसरे नाव आहे रतन टाटा! जाणून घ्या त्यांचे १० प्रेरणादायी विचार
याबद्दलचे अनेक अहवाल देखील आढळले.
https://www.bbc.com/news/articles/cjerjzxlpvdo
दाव्यासह शेअर करण्यात आलेला व्हिडिओ टीआरटी वर्ल्डचा होता, यामुळे टीआरटी वर्ल्डच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ तपासता आले.
पॅलेस्टिनी परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी इस्रायलच्या ताब्याबाबत ICJ च्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीचा २ मिनिटांचा व्हिडिओ सापडला.
येथे, मंत्री पॅलेस्टाईनवर इस्रायलच्या बेकायदेशीर ताब्याबद्दल बोलले.
अल जझीरा इंग्लिश X हँडलवर ४ मिनिटे ४८ सेकंदांचा व्हिडिओ देखील सापडला. हा व्हिडिओ १९ जुलै २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता.
यामध्ये पॅलेस्टिनी एफएम रियाद अल-मलिकी असे म्हणताना ऐकले होते की, “पॅलेस्टाईनसाठी, न्यायासाठी आणि आंतरराष्ट्रीय कायद्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. इस्रायलचा कब्जा जागतिक न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केला आहे.”
निष्कर्ष: आंतरराष्ट्रीय न्यायालयाने व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलची सतत उपस्थिती बेकायदेशीर असल्याचे निर्णय दिल्यानंतर पॅलेस्टिनी एफएम रियाद अल-मलिकीचा प्रेस ब्रीफिंगचा जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर करण्यात आला. ICJ ने इस्रायलला बेकायदेशीर राष्ट्र घोषित केलेले नाही.