Jaya Kishori Viral Photo : आध्यात्मिक प्रवचनकार, कथाकार व प्रेरणादायी व्याख्यात्या जया किशोरी अलीकडेच एका लक्झरी बॅगमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. ती चर्चा थांबत नाही, तोवर एका नव्या कारणामुळे त्या ट्रेंड होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला जया किशोरी यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्यांनी मॉडेलिंग सुरू केल्याचा दावा केला जात आहे. जया किशोरी यांच्या या नव्या फोटोंमुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण खरंच त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले का? याविषयी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले; जे काय होते ते आपण जाणून घेऊ….

काय व्हायरल होत आहे?

क्षत्रिया नावाच्या एका एक्स युजरने तिच्या अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे.

car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
AI generated image of PM Narendra Modi Goes Viral
PM Narendra Modi: कामगाराने गुपचूप काढला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो? पण व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा सत्य बाजू…
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Tirupati Balaji Pujari Fact Check in marathi
१२८ किलो सोनं, हिरे आणि कोट्यवधींची रोकड; तिरुपती बालाजी मंदिराच्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ video खरा की खोटा; वाचा सत्य
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”

इतर युजर्सदेखील तोच फोटो शेअर करीत आहेत.

हेही वाचा – Free Aadhaar update: उरले फक्त ४ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;

तपास :

हा फोटो एआय निर्मित आहे हे आम्हाला सूचित करणारी पहिली गोष्ट दिसली आणि ती म्हणजे हा फोटो अगदीच दोषरहित म्हणजे परफेक्ट, असा होता.

त्यानंतर आम्ही काही एआय डिटेक्टरद्वारे फोटोची तपासणी केली.

तेव्हा HIVE मॉडरेशनने सुचवले की, हा फोटो एक तर AI-निर्मित किंवा डीपफेक असावा.

jaya kishori fact check photo
जया किशोरी फॅक्ट चेक फोटो

ऑप्टिक AI किंवा Not AI डिटेक्टर टूलने आउटपुट दिले की, तो फोटो AI द्वारेच तयार केला आहे.

jaya kishori fact check photo
जया किशोरी फॅक्ट चेक फोटो

दुसऱ्या एका डिटेक्टरने पुन्हा हा फोटो तपासला तेव्हा त्यातून असा निष्कर्ष निघाला की, फोटो एक तर संगणकावर तयार केला गेला असावा किंवा मूळ फोटोत छेडछाड करून हा फोटो तयार करण्यात आला असावा.

jaya kishori viral fact check photo
जया किशोरी व्हायरल फॅक्ट चेक फोटो

त्यानंतर आम्ही sightengine.com वापरूनदेखील फोटो तपासला. यावेळी डिटेक्टरने सुचवले की, फोटो GenAI वापरून बनवला गेला आहे, तसेच त्यासाठी स्टेबल डिफ्युशनचा वापर केला गेला आहे.

jaya kishori viral fact check photo
जया किशोरी व्हायरल फॅक्ट चेक फोटो

निष्कर्ष :

आध्यात्मिक प्रवचनकार, कथाकार व प्रेरणादायी व्याख्यात्या जया किशोरी मॉडेलिंग क्षेत्रात उतरल्या, असा दावा करीत व्हायरल केला जाणारा फोटो बनावट आहे. तो फोटो एआय निर्मित किंवा एडिटिंग टूल्सचा वापर करून बनवला गेला आहे. त्यामुळे व्हायरल झालेला फोटो दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader