काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसला खोटा म्हटले असून “काँग्रेस नेत्यांकडे काळा पैसा आहे, अशी कबुली दिली आहे पण तपासादरम्यान हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे.

काय होत आहे व्हायरल?

यूट्यूब चॅनल पब्लिक पॉवर मीडियाने व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.

delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
mallikarjun kharge yogi adityanath
Video: डोक्यावरून हात फिरवत खर्गेंची योगी आदित्यनाथांवर खोचक टीका; म्हणाले, “ते डोक्यावर केस…”!
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

हेही वाचा –बिहारच्या राजकारणात खळबळ! नितीश कुमारांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट? Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य

फेसबुर व्हिडीओ येथे पाहा – https://www.facebook.com/ussinghjnp/posts/pfbid0xQpZ5ou8TBArMLBmkn6RLCNrVcb67BmBUuKrkMV5GmF9rkzEw4aiUiMzQELc2Gy3l

तपास काय सांगतो?

व्हिडीओमध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे असे म्हणताना दिसले की, “अरे मोदी प्रधानमंत्री हैं , वो कैसे झूठ बोल सकते हैं?( मोदी पंतप्रधान आहेत, ते खोटे कसे बोलू शकतात? जोरात म्हणा, तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, काँग्रेस पक्ष खोटा आहे, “काँग्रेस नेत्यांकडे काळा पैसा आहे.”

व्हिडिओमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर उलट प्रतिमा शोध घेतला आणि आढळले की हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकीदरम्यान स्ट्रीम करण्यात आला होता.

वनइंडिया हिंदी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.

हेही वाचा – लाडक्या बाप्पासाठी चिमुकल्याने गायले “आमच्या पप्पांनी गणपती आणला”गाणे, गोंडस हावभाव बघून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू, पाहा Viral Video

व्हिडिओचे शीर्षक होते: LIVE: सोनिया, प्रियांका आणि खरगे जयपूर, राजस्थानमध्ये जाहीर रॅली | लोकसभा निवडणूक 2024

व्हिडिओमध्ये ३४८ मिनिटांनी खर्गे भाषणासाठी मंचावर आले. सुमारे ५३ मिनिटांनी ते “मोदी पंतप्रधान आहेत ते खोटे कसे बोलू शकतात” असे म्हणताना ऐकू आले. मग ते विचारतात मोदी खोटे आहेत की काँग्रेस पक्ष लबाड आहे? मग ते पुढे म्हणतात, “मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाचे लोक त्यांचा काळा पैसा इतर देशांमध्ये ठेवतात, तर मी तो आणून वाटून टाकेन, त्यांनी ते केले का?”

हे पुष्टी करते की, व्हिडिओ बदलला आहे.

स्क्रीनच्या तळाशी संपादित व्हिडिओमध्ये ‘पालम साउंड’ दिसत आहे. एएनआय न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर हे पाहायला मिळाले.

निष्कर्ष: काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस सदस्यांना “काँग्रेस नेत्यांकडे काळा पैसा आहे अशी कबुली देणारा व्हिडिओ एडिटेड आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.