Mohammad Shami Sania Mirza Fact Check Photo : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. त्यात मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांनी लग्न केल्याचा दावा फोटोंबरोबर केला जात आहे. या फोटोंमुळे आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. पण, शमी आणि सानियाने लग्न केल्याचा व्हायरल होणारा दावा कितपत सत्य आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा खरी माहिती समोर आली, ती नेमकी काय होती जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

Star Mahal Tv या फेसबुक यूजरने व्हायरल झालेले फोटो खोट्या दाव्यासह शेअर केले आहेत.

इतर युजर्स देखील त्याच दाव्यासह हेच फोटो शेअर करत आहेत.

इतर तत्सम फोटो देखील याच दाव्याने शेअर केली जात आहेत.

तपास:

आम्ही अनेक एआय डिटेक्शन टूल्सवर व्हायरल फोटोंचा कोलाज अपलोड करून, आमचा तपास सुरू केला.

HIVE मॉडरेशन या एआय टूलने परिणाम दर्शवले की, हे फोटो AI-निर्मित आहेत.

i

आम्ही हे फोटो दुसऱ्या AI डिटेक्टरद्वारे देखील तपासले. aiimagedetector.org ने देखील ८२.०४ टक्के हे फोटो AI-निर्मित असल्याचे दर्शवले.

तसेच https://wasitai.com/ ने देखील हे फोटो AI निर्मित असल्याचे दर्शवले.

इतर फोटो देखील AI-निर्मितच आहेत.

मोहम्मद शमी किंवा सानिया मिर्झाने व्हायरल झालेल्या फोटोंबद्दल काही विधान केले आहे का तेदेखील आम्ही तपासले.

यावेळी जून आणि जुलै २०२४ मध्ये मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांच्या वडिलांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/mohammed-shami-reacts-to-rumours-of-his-wedding-with-sania-mirza-anybody-can-do-such-acts- hiding-behind-unverified-pages/articleshow/111890291.cms

याबाबतच्या एका बातमीत म्हटले आहे की, मोहम्मद शमीने मीम क्रिएटर्सना त्यांची जबाबदारी ओळखत असे बनावट फोटो तयार करणे आणि चुकीची माहिती पसरवणे टाळावे, असे आवाहन केले. विशेषतः वैयक्तिक बाबींबद्दल अशा प्रकारे कोणतीही खोटी माहिती पसरवू नका, असेदेखील म्हटले आहे.

दुसऱ्या बातमीत, सानिया मिर्झाच्या वडिलांनीही अफवा फेटाळून लावल्या : एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, वडील इम्रान यांनी सांगितले की, त्यांची मुलगी क्रिकेटरला भेटलेलीदेखील नाही. त्यामुळे या अफवा बकवास आहेत. ते म्हणाले होते, “अशा प्रकारच्या बातम्या विनाकारण पसरवल्या जात आहेत. ती त्याला भेटलीही नाही.”

https://www.hindustantimes.com/trending/sania-mirza-s-father-breaks-silence-on-rumours-of-tennis-star-marrying-cricketer-mohammed-shami-101718974605950.html

निष्कर्ष:

मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अधिकृतपणे विवाहित असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणारे व्हायरल फोटो AI-निर्मित आहेत. त्यामुळे मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचे व्हायरल फोटो बनावट आहेत, तसेच त्याबरोबर केला जाणार दावाही खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check mohammad shami sania mirza marriage viral photos ai generated sjr