Mosque Set On Fire In India Fact Check Video : भारतातील भीषण अपघात अन् आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत; ज्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. अशात लाइटहाऊस जर्नलिझमलाही सोशल मीडियावर एका आगीच्या दुर्घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे आढळून आले. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतातील एका मशिदीला आग लावण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये मशिदीचा घुमट जळून पूर्णपणे खाक झाल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेनंतर लोक आग विझवण्यासाठी रस्त्यावर धावपळ करून, शिकस्तीचे प्रयत्न करीत आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक जण भारतातील हा नेमका कुठला व्हिडीओ आहे, असा सवाल करत आहेत. त्यामुळे आम्ही हा व्हिडीओ भारतातील नेमक्या कुठल्या ठिकाणावरील आहे याचा तपास केला, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं, ते नेमकं काय आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @ImranHosse5342 ने त्याच्या अकाउंटवर दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सने देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर केला आहे.
https://x.com/SabbirA73631882/status/1868260295631949927
तपास :
आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला ८ डिसेंबर रोजी Tolitoli News ने पोस्ट पब्लिश केलेल्या न्यूजची एक फेसबुक पोस्ट मिळाली.
शीर्षकात नमूद केले होते की (अनुवाद) : रविवार, ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी सेंट्रल मार्केट, लुवुक, बांगगाई येथे भीषण आग लागली. या ठिकाणी भविष्यात एक मॉल बांधला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यावेळी तिथल्या डिस्पेरिंडाग पक्षानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
त्यानंतर आम्ही कीवर्डच्या आधारे सर्च करण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्हाला आढळले की, सेंट्रल मार्केट, लुवूक, बांगगाई हे ठिकाण इंडोनेशियामध्ये आहे.
यावेळी आम्हाला POS – KUPANG.COM च्या फेसबुक पेजवर याबद्दलचा एक व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडला.
त्यानंतर आम्ही Google Maps वर मशिदीचे भौगोलिक स्थान शोधले. यावेळी मशीद AL – IKHSAN ही पासर सेंट्रल, इंडोनेशियातील येथील आहे, असे दर्शवले गेले. यावेळी आम्ही गूगल इमेज आणि व्हायरल पोस्टमधील कीफ्रेम्स यांच्यात तुलना केली तेव्हा ही मशीद इंडोनेशियामधील असल्याचे आणि तिथेच ही घटना घडल्याचे समोर आले.
https://shorturl.at/hCyLm
निष्कर्ष:
निष्कर्ष : भारतात मशिदीला आग लावण्यात आली, असा दावा करीत शेअर करण्यात येणारा व्हायरल व्हिडीओ प्रत्यक्षात इंडोनेशियातील एका दुर्घटनेचा आहे. त्यामुळे व्हायरल होणारा दावा बनावट आणि दिशाभूल करणारा आहे.