Fact Check Video: लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळून आलाय. या व्हिडीओमध्ये चार ते पाच तरुणांचा गट एका तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर या घटनेला एक धार्मिक वळण दिलं जातं आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तपासादरम्यान या व्हिडीओमागील एक सत्य बाजू समोर आली आहे, ती नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर @iamharunkhan ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह एक व्हिडीओ शेअर केला.
इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://twitter.com/ItsKhan_Saba/status/1813271109707702502
तपास:
गूगल रिव्हर्स इमेज सर्च आणि गूगल कीवर्ड सर्च यांचा वापर करून आम्ही या व्हायरल व्हिडीओचा तपास सुरू केला. यावेळी आम्हाला द प्रिंटवर या घटनेबद्दलचा वृत्तांत सापडला.
https://theprint.in/india/youth-beaten-to-death-in-delhis-jahangirpuri-3-held/1707812/
अहवालात नमूद केले आहे की, पोलिसांनी सांगितले की एका किशोर नावाच्या मुलाने कैफला मारहाण केली, जो नंतर त्याच्या काही मित्रांसह परतला आणि तरुणाला पुन्हा मारहाण केली.
अहवाल ९ ऑगस्ट २०२३ रोजी अपलोड करण्यात आला.
आम्हाला टाईम्स ऑफ इंडियावर एक अहवाल सापडला.
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/two-juveniles-among-3-held-for-murder-in-delhis-jahangirpuri/articleshow/102589031.cms
अहवालात नमूद केले आहे की, अल्पवयीन मुलाने त्याच्या इतर मित्रांना घटनेची माहिती दिली आणि त्यांनी हत्येची योजना आखली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “आरोपी आणि पीडित वेगवेगळ्या समुदायातील आहेत, परंतु या घटनेत जातीय काहीही नाही.”
हेही वाचा >> मुस्लिम समुदायाने शीख व्यक्तींवर लाठ्या-काठ्यांसह केली दगडफेक? घटनेचा VIDEO व्हायरल; पण नेमकं सत्य काय?
पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवर आम्हाला डीसीपी उत्तर-पश्चिम दिल्लीचे उत्तरदेखील सापडले.
निष्कर्ष : तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, व्हिडीओ जुना आहे आणि एका मुस्लीम तरुणाला हिंदूंनी मारहाण केल्याचा दावा खोटा असून यामध्ये कोणताही जातीय अँगल नाही. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.