Fact check of dilapidated bridge Viral Photo: सोशल मीडियावर नेहमी असंख्य फोटो व्हायरल होत असतात. पण, काही जण चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतात. सध्या लाइटहाउस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक असा फोटो सापडला आहे, जिथे एक पूल जीर्ण अवस्थेत दिसत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीर्ण पूल भारतातील असल्याचा दावाही या फोटोसह केला जात होता. काही पोस्टमध्ये हा पूल २०१४ नंतर बांधण्यात आला असल्याचा दावा केला जात होता. तपासादरम्यान हा फोटो भारतातील नसून बांगलादेशातील आहे हे आढळून आले.

हेही वाचा… पठ्ठ्याची हिंमत तर बघा! मिरवणूकीत चक्क पोलिसांसमोर केला डान्स अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “एक तरी नमुना…”

काय होत आहे व्हायरल?

X वापरकर्ता आकिब अन्वरने त्याच्या हँडलवर एक भ्रामक दावा करत फोटो शेअर केला आहे.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://archive.ph/jL4VD

इतर वापरकर्ते देखील दिशाभूल करणारा दावा शेअर करत आहेत.

हेही वाचा… एसी व्हेंटमधून अचानक बाहेर आला साप अन्…, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांची पळापळ; VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का

तपास:

आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

Dailyswadhinbangla.com या वेबसाइटवरील लेखात आम्हाला असाच एक फोटो आढळला.

https://www.dailyswadhinbangla.com/details.php?id=5572568

रिपोर्टचे शीर्षक होते (अनुवाद) : अमतालीचा जोड पूल जणू मृत्यूचा सापळाच आहे.

हा अहवाल १९ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला होता. त्यात नमूद केले आहे : बरगुना येथील अमताली उपजिल्हामधील चावरा आणि हल्दिया युनियनला जोडणारा लोखंडी पूल अत्यंत दयनीय झाला आहे, पूल तुटला आहे. हा धोकादायक पूल ओलांडण्यासाठी दोन्ही युनियनच्या १५ हजार नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.

आम्हाला आढळले की, रिपोर्टमध्ये नमूद केलेले प्रदेश बांगलादेशातील आहेत.

आम्हाला thedailystar.net वेबसाइटवर जीर्ण पुलाचा फोटोदेखील आढळला.

https://www.thedailystar.net/country/news/seven-deadly-bridges-four-unions-2116225

mzamin.com या वेबसाईटवरदेखील आम्हाला पुलाचा फोटो मिळाला.

https://mzamin.com/news.php?news=116333

रिपोर्टचे शीर्षक होते : अमतालीतील १९ धोकादायक पूल, लाखो लोकांमध्ये भीती.

ही बातमी जून, २०२४ मध्ये प्रकाशित झाली होती. त्याचप्रमाणे जुलै २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अहवालात, kalerkantho.com मध्येदेखील असाच फोटो जोडला गेला आहे, जो भारतातील पुलाचा असल्याचा दावा करत मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

हेही वाचा… फक्त एक क्लिक आणि १० मिनिटांच्या आत iPhone 16 तुमचा, Blinkitने अवघ्या काही वेळातच केला ३०० ऑर्डर्सचा टप्पा पार

https://www.kalerkantho.com/online/country-news/2024/07/01/1402158

निष्कर्ष: बांगलादेशातील जीर्ण पुलाचा फोटो भारतातील असल्याचा सांगून व्हायरल केला जात आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fact check of dilapidated bridge viral photo pool isnt from india its from bangladesh dvr