Fact check Of Donald Trump Viral Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषण देत असताना स्टेजवर एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केल्याचे दिसून आले. तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, व्हायरल व्हिडीओ एडिटेड असून, जुना आहे.

तर नक्की काय होतेय व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर अना घदीरी क्विझने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्सदेखील त्यांच्या प्रोफाइलवर व्हिडीओ शेअर करीत आहेत.

https://www.facebook.com/reel/907794804691996

https://www.facebook.com/watch/?v=964703129073498

तपास :

आम्ही व्हिडीओ इनव्हिड टूलमध्ये अपलोड केला आणि व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

हा व्हिडीओ २०२० पासून सोशल मीडियावर फिरत आहे.

आम्हाला नऊ वर्षांपूर्वी सीबीएस न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वंडालिया, ओहायो येथील रॅलीत एका अज्ञात व्यक्तीने स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गुप्तचर सेवा एजंटांनी त्यांच्या रक्षणासाठी धाव घेतली. ट्रम्प त्याचा सामना करण्यास तयार होते; पण सुरक्षा यंत्रणेने हा व्यत्यय हाताळण्यास प्राधान्य दिले.

आम्हाला १२ मार्च २०१६ रोजी अपलोड केल्या गेलेल्या या घटनेबद्दलचे एक वृत्तही सापडले.

https://www.thejournal.ie/protests-donald-trump-2655884-Mar2016

निष्कर्ष : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान एक माणसाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा जुना एडिटेड व्हिडीओ आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.