Fact Check Of Sudha And Narayan Murthy Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ सापडले, ज्यात लेखिका, समाजसेवी सुधा मूर्ती आणि त्यांचे पती, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आहेत. या व्हिडीओमध्ये दोघेही एका योजनेमध्ये लोकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देताना दिसले आहेत. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हे व्हिडीओ खोटे आहेत आणि त्यांनी लोकांना रिटर्नमध्ये जास्त पैसे मिळवून देण्यासाठी २१ हजार रुपये गुंतवण्यास प्रोत्साहन दिलेले नाही. कारण- हे व्हिडीओ एआयच्या मदतीने बनवण्यात आले आहेत.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजर एव्हिएटर उस्मान यांनी फेसबुकवर एक व्हायरल पोस्ट शेअर केली आहे.
https://www.facebook.com/share/165Pa44S2r
व्हिडीओंत सुधा मूर्ती या दिलेल्या लिंकवर नोंदणी करून, लोकांना योजनेत गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत आहेत.
अर्काइव्ह व्हर्जन पाहा.
https://archive.ph/n3xcp
फेसबुक युजर कुमवांबा यांनीही नारायण मूर्ती यांचा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ इंडिया टुडेच्या लोगोसह शेअर करण्यात आला होता आणि त्यात प्रसिद्ध पत्रकार त्यांच्याशी संवाद साधत आहेत, असेसुद्धा दिसत आहे.
अर्काइव्ह व्हर्जन.
https://archive.ph/qIxTp
तपास :
व्हिडीओ १ :
व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
कीफ्रेम्सवरून फारसे पुरावे मिळाले नाहीत. म्हणून आम्ही फक्त व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या ‘पांढऱ्या साडीत सुधा मूर्ती’ (Sudha Murthy in a white saree) या गुगल कीवर्ड सर्चचा वापर केला.
असे सर्च केल्यावर आम्हाला यूट्यूबवर एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये व्हायरल व्हिडीओसारखे व्हिज्युअल होते.
परंतु, त्या व्हिडीओमध्ये सुधा मूर्ती साड्यांबद्दल बोलत होत्या; गुंतवणूक योजनांबद्दल नाही.
यूट्यूबवर शेअर केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये आम्हाला असेच व्हिज्युअल आढळले. कीफ्रेम्स सारख्याच होत्या फक्त सुधा मूर्ती यांनी स्वतःमध्ये काय बदल घडवले आहेत ते त्या सांगत होत्या. हा व्हिडीओ २०२१ मध्ये अपलोड करण्यात आला होता.
https://www.youtube.com/watch?v=sY72R9f1gEY
यूट्यूबवर असेच व्हिडीओ उपलब्ध होते. पण, यापैकी कोणत्याही व्हिडीओमध्ये सुधा मूर्ती योजनेचे समर्थन करताना अजिबात दिसल्या नाहीत.
https://www.youtube.com/shorts/BHaqmwAqer4
आम्ही हा व्हिडीओ ऑडिओमध्ये रूपांतरित केला आणि नंतर तो Hiya नावाच्या InVid टूलमध्ये एम्बेड केलेल्या एआय व्हॉइस डिटेक्टरद्वारे तपासून पाहिला, तेव्हा टूलने ऑडिओ एआय जनरेटेड असल्याचे सांगितले.
व्हिडीओ २ :
आम्ही व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील नारायण मूर्ती यांचा ऑडिओ InVid टूलमध्ये एम्बेड केलेल्या Hiya AI व्हॉइस डिटेक्टरद्वारे तपासला. त्यावरून असे दिसून आले की, हा आवाज एआय जनरेटेड होता.
कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्चमध्ये फारसे निकाल मिळाले नाहीत. म्हणून आम्ही वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला.
लाईटहाऊस जर्नलिझमशी बोलताना राजदीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट आहे आणि गुंतवणूक योजनांबाबत नारायण मूर्तींशी त्यांचे कोणतेही संभाषण झालेले नाही. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी नारायण मूर्तींची मुलाखत घेतली होती, असे त्यांनी सांगितले
निष्कर्ष :
सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती गुंतवणूक योजनेला मान्यता देत असल्याचे व्हायरल व्हिडीओ बनावट आहेत. हे दोन्ही व्हिडीओ एआय टूल्स वापरून तयार केले गेले आहेत.