Fact Check Of Viral Video : व्हायरल व्हिडीओ आणि रिपोर्टनुसार प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जात आहेत. अलीकडच्या एका रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत ४६ ते ४७ कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभाला भेट दिली आहे आणि माघ पौर्णिमेला १.३ कोटींहून अधिक भाविकांनी स्नानसुद्धा केले आहे.
अशा बातम्यांमध्ये, प्रयागराजमधील महाकुंभात लोक भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांवर बूट फेकत असल्याचा दावा करणारासुद्धा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ प्रयागराजमधील महाकुंभातील नाही तर बिहारमधील आहे.
तर नक्की काय होत आहे व्हायरल?
@inderjeetbarak इंद्रजीत बराक या एक्स युजरने व्हायरल दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘कुंभमेळ्यात लष्कराच्या जवानांवर राष्ट्रवादी आणि सनातनी लोकांनी चप्पल फेकली! तो मुस्लीम असता तर आज सर्व सरकारी माध्यम वाहिन्यांवर हीच बातमी आली असती, पण कदाचित हे सर्व या धर्माच्या लोकांना मान्य आहे’; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
इतर युजर्सही त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://twitter.com/sunil1997_/status/1889860379544789046
तपास :
आम्ही इनविड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड केला आणि व्हिडीओमधून कीफ्रेम्स मिळवल्या. त्यानंतर आम्ही कीफ्रेम्सवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चालवला.
आम्हाला एका इन्स्टाग्राम पेजवर रीलच्या स्वरूपात अपलोड केलेल्या व्हिडीओमधील दृश्ये सापडली.
कॅप्शनवरून असे सूचित होते की, हा व्हिडीओ पाटण्यातील ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे.
आम्हाला तोच व्हिडीओ यूट्यूबवरसुद्धा सापडला.
आम्हाला इन्स्टाग्राम पेजवर अपलोड केलेला व्हिडीओ “ब्युटी ऑफ बिहार” सापडला.
हा व्हिडीओ १७ नोव्हेंबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता आणि कॅप्शनमध्ये ‘पाटण्याच्या गांधी मैदान येथे पुष्पा २ चा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी, जनतेने गोंधळ घातला होता’, असे म्हटले होते.
या घटनेबद्दल अनेक बातम्याही प्रकाशित करण्यात आल्या आहेत…
https://www.hindustantimes.com/entertainment/telugu-cinema/pushpa-2-trailer-launch-chaos-as-patna-fans-try-to-get-close-to-allu-arjun-rashmika-mandanna-police-lathi-charges-crowd-101731898170085.html
निष्कर्ष : पोलिसांना त्रास देणाऱ्या लोकांचा व्हिडीओ सध्या सुरू असलेल्या महाकुंभातील नाही. तर व्हायरल व्हिडीओ बिहारची राजधानी पाटणा येथील ‘पुष्पा २’च्या ट्रेलर रिलीजदरम्यानचा आहे. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे हे सिद्ध झाले आहे.