Fact Check Of Indian Prime Minister Narendra Modi Viral Photo : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी पॅरिसमधील दूतावासानंतर देशातील दुसऱ्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. या भेटीदरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हायरल फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कारमधून उतरताना दिसत आहेत. ते पाहून असा दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या अलीकडच्या फ्रान्स दौऱ्यात टॅक्सीने जावे लागले. तपासादरम्यान आम्हाला हा दावा खोटा असल्याचे आढळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल ?

एक्स युजर्स @wankar_sun93339 सुनील व्हीबीने एक फोटो ‘अरे, फ्रान्सच्या लोकांनो, आमच्या विश्वगुरूंचा इतका अपमान करू नका. तुम्ही त्यांना टॅक्सीतून नाही न्यायला पाहिजे होत’ ; या कॅप्शनसह शेअर केला आहे.

https://twitter.com/wankar_sun93339/status/1889643638977605862

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह फोटो शेअर करीत आहेत.

https://twitter.com/currentnew18254/status/1890249461982720111

https://twitter.com/Toddarmal/status/1890040671777775700

https://twitter.com/Toddarmal/status/1889927746098438362

तपास :

मग आम्ही फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला आढळले की, २०२१ मध्येही हाच फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता.

https://twitter.com/SibaniMondal1/status/1454808745196675076

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान, आम्हाला ANI च्या एक्स (ट्विटर) हँडलवर अपलोड केलेली व्हायरल इमेज आढळली.

https://twitter.com/ANI/status/1454335010438144009

वाहनाची नंबर प्लेट व्हायरल झालेल्या फोटोसारखीच होती.

https://twitter.com/ANI/status/1454335010438144009/photo/1

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० ऑक्टोबर २०२१ रोजी पोप फ्रान्सिस यांच्याबरोबर खासगी भेटीसाठी व्हॅटिकन सिटीमधील सॅन दामासो प्रांगणात (San Damaso courtyard in The Vatican) भेट दिली होती.

https://www.moneycontrol.com/news/photos/world/in-pics-pm-narendra-modi-arrives-in-vatican-city-to-meet-pope-francis-7654801-10.html

आम्हाला ANI च्या यूट्यूब चॅनेलवर यासंबंधीचा एक व्हिडीओदेखील सापडला, ज्यामध्ये वाहनाची नंबर प्लेट स्पष्टपणे दिसत होती. पण, हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

निष्कर्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटीमध्ये ज्या कारमधून बाहेर पडले होते, त्या कारचा एक जुना, एडिट केलेला फोटो अलीकडच्या फ्रान्स दौऱ्यात ते टॅक्सीतून बाहेर पडत असल्याचा दावा करीत शेअर केला जात आहे. पण, व्हायरल फोटो एडिट केलेला आहे आणि हा व्हायरल दावासुद्धा खोटा आहे.