Fact check Of Viral Videos Of Pakistan : मंगळवारी पाकिस्तानच्या नैर्ऋत्य बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मी (BLA)च्या अतिरेक्यांनी क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला हायजॅक केले. त्यानंतर पाकिस्तानी अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या ट्रेनमधून उर्वरित प्रवाशांची सुटका केली. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, व्हायरल व्हिडीओ अलीकडील अपहरणाशी संबंधित नाहीत.
काय होत आहे व्हायरल?
व्हिडीओ १ :
एक्स युजर राहुल अरोधियाने हा व्हिडीओ अलीकडील अपहरण घटनेतील असल्याचा दावा करून शेअर केला.
https://twitter.com/RAHULARODHIA/status/1899705600675889326
इतर युजर्सदेखील तोच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
https://twitter.com/ag_Journalist/status/1899702787224547804
व्हिडीओ २ :
सुमित जयस्वाल या एक्स युजरने हा व्हिडीओ पाकिस्तान हायजॅकमधील असल्याचा दावा करीत शेअर केला आहे.
https://twitter.com/sumitjaiswal02/status/1899521233659818485
इतर युजरदेखील तो शेअर करीत आहेत.
https://twitter.com/1harshdixit/status/1900022310750359823
https://twitter.com/ashishranwa1818/status/1899828676901953620
व्हिडीओ ३ :
संजू सिंग या एक्स युजरने त्याच्या प्रोफाईलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://twitter.com/sanju_singh24/status/1899708021036748929
इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
व्हिडीओ १ :
https://twitter.com/RAHULARODHIA/status/1899705600675889326
आम्ही पहिल्या व्हिडीओसह आमचा तपास सुरू केला, तो InVid टूलमध्ये अपलोड करून आणि व्हिडीओमधून कीफ्रेम्स मिळवून आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला.
आम्हाला TRACCeterrorism च्या एक्स (ट्विटर) प्रोफाइलवर पोस्ट केलेला व्हिडीओ आढळला. हा व्हिडीओ ८ जुलै २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला होता.
https://twitter.com/TracTerrorism/status/1810202528530702577
कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ०५ जुलै २०२४ – र#तेहरिकतालिबान पाकिस्तान (#TehreekeTaliban Pakistan) (#टीटीपी)चा हाफिज गुल #बहादूर (#एचजीबी) याने उत्तर #वझिरिस्तान, खैबर पख्तूनख्वा, #पाकिस्तान येथील स्पिन वाम भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. यावरून असे सूचित होते की, हा व्हिडीओ २०२४ चा आहे आणि अलीकडील नाही.
व्हिडीओ २ :
https://twitter.com/sumitjaiswal02/status/1899521233659818485
या व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यामुळे आम्हाला फ्रंट लाइनच्या इन्स्टाग्राम अकाउंटने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेले.
दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, सोमवारी कराचीच्या गुलशन-ए-मयमार येथील मीर चकार परिसरात आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आम्हाला ईटाइम्स पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला.
वर्णनात असे म्हटले आहे : सोमवारी कराचीच्या गुलशन-ए-मयमार येथील मीर चकार परिसरात आग लागली. आगीचे कारण अद्याप अज्ञात आहे आणि अधिकारी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी काम करीत आहेत.
व्हिडीओ ३ :
https://twitter.com/sanju_singh24/status/1899708021036748929
आम्ही या व्हिडीओसोबतही असेच केले, ते InVid टूलवर अपलोड केले आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
यामुळे आम्हाला एक्स वापरकर्ता अंशुल सक्सेना यांनी १९ जुलै २०२४ रोजी पोस्ट केलेला व्हिडीओ मिळाला.
https://twitter.com/AskAnshul/status/1814310323244949635
२० जुलै २०२४ रोजी फेसबुकवर पोस्ट केलेली एक रीलही आम्हाला सापडली.
https://www.facebook.com/reel/805264445076376
कॅप्शनचे भाषांतर ‘बन्नू गोळीबार घटनेचा व्हिडीओ’ असे केले आहे.
आम्हाला ३३ आठवड्यांपूर्वी २० जुलै २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडीओदेखील सापडला.
निष्कर्ष : पाकिस्तानमधील असंबंधित, जुने व्हिडीओ पाकिस्तान ट्रेन अपहरण घटनेतील अलीकडील आहेत, असे म्हणून शेअर केले जात आहेत; पण आमच्या तपासानुसार व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.