Fact Check Of Rahul Gandhi Old Video : लाईटहाऊस जर्नलिझमला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला व्हिडीओ सापडला. या व्हिडीओमध्ये कोणाचेही नाव न घेता, राहुल गांधी भाजपा सरकार गेल्यानंतर कठोर कारवाई करण्याबद्दल बोलत असल्याचे दिसत आहेत. कॅप्शनवरून असे दिसून येते की, राहुल गांधी हिंदूंविरुद्ध अशा कठोर कारवाईबद्दल बोलत आहेत, ज्याचा कधीही, कोणीही विचारसुद्धा केला नसेल.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक युजर आर. एन. शर्मा यांनी त्यांच्या प्रोफाइलवर दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासच ‘जेव्हा भाजपचे सरकार हटवले जाईल, तेव्हा हिंदूंवर अशी कारवाई केली जाईल, ज्याचा हिंदूंनी विचारही केला नसेल. बारबालाच्या इटालियन मतिमंद मुलाचा बेकायदा जन्म हा देशवासीयांसाठी उघड धोका आहे. यावर निवडणूक आयोग काही कारवाई करणार का?’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

https://www.facebook.com/share/v/12HGGuRcMS6

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

मानिकम टागोर या युजरने एक्स (ट्विटर)वर राहुल गांधींबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आणि ‘सत्तेचे परिणाम होतात! ज्याप्रमाणे तेलंगणा फोन टॅपिंग प्रकरणात सत्तेच्या गैरवापराची आठवण करून देणारी घटना घडली, त्याचप्रमाणे ४ जून २०२४ रोजी दिल्लीत ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतींसाठी शिक्षा भोगावी लागेल. कायद्याच्यावर कोणीही नाही’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

व्हिडीओमध्ये राहुल गांधी भारतातील प्रमुख तपास संस्था, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याबद्दल बोलताना दिसले आहेत. आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला असाच एक व्हिडीओ आढळला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तपास संस्थांना इशारा देत म्हटले आहे की, सीबीआय, ईडी भाजपा सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत. पण, जेव्हा भगवा पक्ष बदलेल तेव्हा आदेशांचे पालन न करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

हा व्हिडीओ मार्च २०२४ मध्ये पोस्ट करण्यात आला होता.

आम्हाला मार्च २०२४ मध्ये राहुल गांधी यांनी लिहिलेली एक्स (ट्विटर)वरची एक पोस्टदेखील सापडली.

आम्हाला २९ मार्च २०२४ रोजी indiatv.com वर प्रकाशित झालेल्या या वृत्ताबद्दलची बातमीदेखील सापडली.

https://www.indiatv.in/india/politics/if-the-government-changes-action-will-be-taken-against-those-who-sabotage-democracy-this-is-my-guarantee-rahul-gandhi-2024-03-29-1034635

रिपोर्टमध्ये म्हटले होते की, (भाषांतर), “जर संस्थांनी, सीबीआय आणि ईडीने त्यांचे काम केले असते, तर हे घडले नसते. त्या सर्वांनी असाही विचार करावा की, एक दिवस भाजपा सरकार बदलेल आणि नंतर अशी कारवाई केली जाईल की, अशी स्थिती पुन्हा कधीच येणार नाही.”

निष्कर्ष : राहुल गांधींचा जुना व्हिडीओ, ज्यामध्ये ते सीबीआय आणि ईडीबद्दल बोलताना दिसत आहेत. पण, हा व्हिडीओ भाजपा सरकार गेल्यानंतर हिंदूंविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार, असे सांगून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे