Fact Check Of Scripted Video : महाकुंभमेळ्याचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले होते. २०२५ चा हा महाकुंभ मेळा भक्तांसाठी खूप खास आहे. १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभ मेळा असणार आहे असे म्हटले जात आहे; तर महाकुंभ मेळ्यात जाण्यासाठी अगदी सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळेच खूप उत्सुक दिसत आहेत आणि त्यांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, काही लोक महाकुंभाला व्हीआयपी स्नानाशी जोडून नकारात्मक आणि दिशाभूल करणारा प्रचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. टीकाकारांनीही नदीकाठावर झालेल्या चेंगराचेंगरी, जीवघेण्या गर्दीत काही लोकांना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी सेवांबद्दल आरोप केला होता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये एका पत्रकाराने महाकुंभ परिसरात एका “व्हीआयपी वाहनाच्या” प्रवेशाबद्दल विचारपूस केल्यानंतर “डीएम”ला कानाखाली मारताना दाखवले आहे. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ स्क्रिप्टेड केलेला आहे आणि तो व्हिडीओ प्रयागराजमधील खऱ्या घटनेचा म्हणून शेअर केला जात आहे.

नक्की काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @ashokdanoda अशोकदोडा यांनी त्यांच्या अकाउंटवरून व्हायरल दाव्यासह एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, पत्रकार कुंभमेळ्यात गाडीमधून येणाऱ्या चालकाला थांबवतात. त्यानंतर महाकुंभमेळ्यात लोकांना चालायला जागा नाही आणि इथे तुम्ही गाड्या घेऊन येताय असे म्हणून गाडीची चावी काढून गाडीत मागे बसलेल्या डीएमला कानाखाली मारून पळून जातो. तसेच या व्हिडीओला ‘व्हीआयपी लोकांसाठी खास उपचार, डीएमनाही मारले कानाखाली’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

एक्स युजर देखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत…

तपास:

आम्ही इनव्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम्स मिळवून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही या कीफ्रेम्सवर एकेक करून रिव्हर्स इमेज सर्च केली.

आम्हाला एका यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. या व्हिडीओचे सौजन्य श्रेय हर्ष राजपूत यांना देण्यात आले होते.

मग आम्ही हर्ष राजपूतच्या यूट्यूब चॅनेलवर गेलो. १२ मिनिटे १४ सेकंदांचा हा संपूर्ण व्हिडीओ पाच दिवसांपूर्वी त्याच्या चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.

या व्हिडीओचे अनेक पार्टस (भाग) आहेत आणि व्हीआयपी एंट्री दाखवणारा व्हिडीओ सुमारे ४ मिनिटे १२ सेकंदांपासून सुरू झाला होता.

हर्ष राजपूतच्या यूट्यूब चॅनेलचे ४.८९ दशलक्ष सबस्क्राइबर्स, इन्स्टाग्राम अकाउंटचे १.२ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. हर्ष राजपूतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यूट्यूब व्हिडीओसारखीच एक क्लिप अपलोड केली आहे. तसेच बायोमध्ये तो एक कंटेंट क्रिएटर असल्याचा उल्लेखदेखील आहे. त्याच्या अनेक व्हिडीओमध्ये तो फेस मास्क घालून व्हिडीओसुद्धा बनवताना दिसला आहे .

https://www.instagram.com/harshrajputin

हर्ष राजपूतने त्याच्या फेसबुक पेजवरही रिपोर्टरचा बिट पोस्ट केला होता आणि त्याच्या व्हिडीओच्या सुरुवातीला डिस्क्लेमरमध्ये असे नमूद केले होते की , ‘हा एक स्क्रिप्टेड व्हिडीओ आहे आणि तो फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे’

https://www.facebook.com/dhakadpage1/videos/1022404869725650

Fact Check

‘महाकुंभ २०२५ वरील मजेदार व्हिडीओ, केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने’; अशी कॅप्शनसुद्धा व्हिडीओला देण्यात आली आहे.

निष्कर्ष : महाकुंभाच्या निमित्ताने प्रयागराजमधील व्हीआयपी सेवांचा अपमान करणाऱ्या पत्रकाराचा व्हिडीओ खऱ्या घटनेच्या रूपात शेअर केला गेला आहे. पण, व्हायरल दावा खोटा आहे, हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे हे सिद्ध झाले आहे.

Story img Loader