Fact check Of Viral Video : गेल्या आठवड्यात नागपूर दंगलीनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दंगलीदरम्यानचे किंवा त्यानंतर नागपूरशी जोडणारे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. तर, लाईटहाऊस जर्नलिझमला असाच एक व्हिडीओ आढळला, ज्याच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले होते, ‘नागपूरमधील हिंदूंचा निर्णय’. व्हिडीओमध्ये एक माणूस (इसम) इतरांना पाठिंबा देऊ नका किंवा इतर समुदायाशी व्यवसाय करू नका, हिंदूंना मुस्लिमांशी मैत्री करू नका असे सांगताना दिसत आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ नागपूरचा नाही. तसेच अलीकडील दंगलींशी त्याचा संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजर देवा नंद देवराज यांनी त्यांच्या प्रोफाइलवर व्हायरल व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील तोच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
https://www.facebook.com/APSHAH63/videos/515835144653474/?idorvanity=166539280222545
https://www.facebook.com/ThePatrioticIndian1/videos/1530760304546970
https://twitter.com/S_CRana_ji/status/1902404140460069135
https://twitter.com/KreatelyMedia/status/1902428777482727894
तपास :
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च चालवला.
रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला १६ मार्च रोजी फेसबुकवर संजीव भाटी या युजरने अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.
https://www.facebook.com/sanjeev.bhati.9659/videos/9570829883009907
कॅप्शनमध्ये म्हटले होते की, दिल्लीत ९ मार्च २०२५ रोजी रोहित गुर्जरची गाझीपूर डेअरी फार्ममध्ये राहणाऱ्या जिहादींनी हत्या केली होती. गाझीपूर हे भारताच्या दिल्ली राज्यातील पूर्व दिल्ली जिल्ह्यातील एक गाव आहे. या प्रकरणात पोलिस अजूनही हलगर्जीपणा करीत आहेत. पण, चार मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हे बघता, व्हिडीओतील माणूस “माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या सर्व ३६ समुदायांनी पुढे यावे”, असे म्हणताना दिसतो आहे. ठिकाण- गाझीपूर गाव, वेळ- १२ वाजता, तारीख- २३ मार्च, दिवस- रविवार.
हा लाइव्ह व्हिडीओ १६ मार्चचा होता आणि नागपूर हिंसाचार १७ मार्च २०२५ रोजी घडला होता.
आम्हाला रोहित गुर्जरच्या हत्येशी संबंधित एक बातमीदेखील सापडली, ज्याच्याशी संबंधित गाझीपूरमध्ये महापंचायतदेखील आयोजित करण्यात आली होती.
https://www.livehindustan.com/ncr/rohit-gurjar-killing-in-ghazipur-delhi-mahapanchayat-people-demand-govt-job-with-rs-1-crore-compensation-201742777851333.html
निष्कर्ष : गाझीपूर गावातील एक असंबंधित व्हिडीओ नागपूरमधील अलीकडच्या दंगलीदरम्यानचा आहे म्हणून शेअर केला जात आहे. पण, आमच्या तपासानुसार व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.